चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीचा निर्घृण खून:गुन्हेगार पतीस पोलिसांकडून अटक

पत्नीचे चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिच्याशी वाद घालणाऱ्या पतीने रविवारी मध्यरात्री पत्नीच्या डोक्यात घरातील सिलेंडर जोरात मारून तिचा निर्घृण खून केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे.याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. माधुरी मनोहर मोरे (वय -४७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर मनोहर मोरे असे तिच्या अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे पती-पत्नी हे धानोरी परिसरतील मुंजोबा वस्ती, लेन नंबर १० या ठिकाणी राहतात.पती हा सातत्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने भांडण होत होते. आरोपी पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यातील वाद मिटत नव्हता. रविवारी मध्यरात्री देखील त्यांच्यात याच कारणावरून जोरदार भांडण झाले. त्यानंतर आरोपी पतीने रागाच्या भरात घरातील गॅस सिलेंडर पत्नीच्या डोक्यात घातला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नी माधुरी मोरे यांचा दुर्दैव मृत्यू झाला. दरम्यान ,सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव, विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली. याबाबत पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहेत.

Share

-