मुस्लिमांना कदापि आरक्षण नाही, वक्फ बोर्डाचा कायदाही बदलणार:इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी 370 कलम पुन्हा लागू होणार नाही- शहा
सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंची सर्व तत्त्वे विसरले आहेत. औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारे, राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणारे, कलम ३७० हटवण्यास विरोध करणारे, पाकिस्तानविरुद्धच्या सर्जिकल स्ट्राइकवर आक्षेप घेणाऱ्या औरंगजेब फॅन क्लबसोबत उद्धव ठाकरे आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम परत आणण्याचा प्रस्ताव काँग्रेसने केला आहे. मात्र, राहुल गांधीच नाही तर इंदिरा गांधीदेखील स्वर्गातून परत आल्या तरी ३७० कलम परत आणू शकत नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह यांनी म्हटले. मुस्लिमांना कदापि आरक्षण देणार नाही, वक्फ बोर्डाचा कायदाही बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे सरकार वक्फ बोर्डाचा कायदा बदलणार वक्फ बोर्डाने तामिळनाडूमध्ये जनतेची घरे, गाव व शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा केला आहे. परंतु वक्फ बोर्डाचा कायदा कोणत्याही परिस्थितीत आम्ही बदलणार आहोत. महाराष्ट्रात लाडकी बहीण, विधवा सन्मान योजनांचे मानधन १५०० वरून २१०० रुपये केले जाणार आहे. शेतकऱ्यांचा वर्षाला १२००० असणारा सन्मान निधी १५००० रुपये केला जाईल. शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतची कर्जमाफी लागू होईल. पवारांपेक्षा दुप्पट निधी आणला आघाडी सरकारने काय केले याची यादी द्या, असे म्हणत शरद पवारांवर टीका केली. दहा वर्षे शरद पवार केंद्रामध्ये मंत्री असताना त्यांनी जेवढा निधी आणला, त्यापेक्षा दुप्पट निधी महायुती सरकारने आणल्याचे ते म्हणाले. शहा म्हणाले : वर्षानुवर्षे सत्ता भोगलेल्या काँग्रेसने लोकसभेपाठोपाठ हरियाणा व आता महाराष्ट्रातही अपप्रचार सुरू केला आहे. सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचे अमित शाह यांनी जिंतूरमधील सभेत सांगितले. काँग्रेसची वाटचाल सदैव देशहिताविरोधात राहिली. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक अाहे. भारताची अर्थव्यवस्था जगात ११ व्या स्थानावर होती तिला ५ व्या क्रमांकावर आणण्याचे काम मोदी सरकारने केल्याचे अमित शाह यांनी या वेळी सांगितले.