त्यांना राजकारणात पोरं होत नाही त्यात माझा काय दोष?:भाजपच्या घराणेशाहीच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

भाजपकडून घराणेशाहीवरून विरोधकांवर नेहमीच टीका केली जाते. भाजपच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत घणाघाती टीको केली आहे. वारसा सांभाळणे ही साधी गोष्ट नाही. घराणेशाही म्हणायला यांच्या वडिलांचे काय जाते. भाजपला राजकारणार मुले होत नाहीत, त्यात माझा काय दोष, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी चाळीसगाव येथील सभेत बोलताना पुन्हा भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सोबतच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यावरही निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांच्या बॅगा जाताना तपासा
उद्धव ठाकरे म्हणाले, पहिल्या सभेला उतरलो हेलिकॉप्टरजवळच 5-6 जण उभे होतो. मी त्यांना विचारले तर म्हणाले तुमची बॅग चेक करायची आहे. मी म्हणालो जरुर तपासा. माझी बॅग रोज तपासा किंवा बॅग तुम्हीच घेऊन चला. माझ्याप्रमाणेच मोदी, शहा, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे. ते येताना त्यांच्या बॅगा तपासाच मात्र जाताना देखील आवश्य तपासा. कारण महाराष्ट्र लुटला जात आहे. सिंचनाचे प्रकल्प अनेक वर्ष तेच आहेत, भाजपचे खासदार त्रिफळाचित झाले आहेत. ज्यांना भाषणकार पाहिजे त्यांनी चंद्रचुड यांना घेऊन जावे
उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर निशाणा साधला. सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीश बदलले, चंद्रचुड तर उत्तम भाषणकार आहेत. ज्यांना भाषणकार पाहिजे त्यांनी चंद्रचुड यांना घेऊन जावे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आत्ताच्या नवीन न्यायाधीशांना माझी विनंती आहे, लवकरात लवकर निर्णय घ्या, ज्यामुळे लोकशाही जिवंत राहील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. हे ही वाचा… स्वतः इतकी वर्षे काम केले अन् मला रिटायर व्हायला सांगतायत:अजित पवार यांची शरद पवारांवर टीका बारामती मतदारसंघात काका-पुतण्या आमनेसामने असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. या मतदारसंघात युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी शरद पवार कुटुंबीय मैदानात उतरले आहे. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील घरोघरी प्रचार करत आहेत. याबाबत त्यांना विचारणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच शरद पवार 85 वर्षांचे असून काम करत आहेत, आणि मला रिटायर व्हायला सांगत आहेत, अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-