विचार वेगळे तरी बाळासाहेबांचा कायम आदर:10 वर्षांपासून सरकार, मग निवडणुकीच्या तोंडावर लाकडी बहिण योजना का? प्रियांका गांधीची जोरदार फटकेबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जातनिहाय जनगणना करायला लावावे, असे आव्हान काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी दिले आहे. प्रियांका गांधी यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मध्ये झाली. या वेळी प्रियांका गांधी यांनी राज्य तसेच केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बाळासाहेब ठाकरे आणि यांचे विचार वेगळे आहेत. मात्र त्यांच्याविषयी कायमच मनात आदर असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील अनेक उद्योग इतर राज्यात पाठवले. यावरून देखील प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील अनेक उद्योग मागील दहा वर्षात दुसऱ्या राज्यात गेले असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. मागील दहा वर्षापासून राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांनी महाराष्ट्राला कमजोर करण्याचे काम केले असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. लाडक्या बहिणी योजनेवर टीका राज्यात मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. तर दुसरीकडे टॅक्सच्या माध्यमातून राज्यातील जनतेकडून पैसा वसून केला जात आहे. निवडणुका आल्यानंतर लाडकी बहिण योजनाा लागू करण्यात आल्याचा आरोप प्रियांका यांनी केला. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या हातात पंधराशे रुपये टेकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आली की तीन-चार महिने आधी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिले गेले आणि महिला आम्हाला मतदान करतील असे त्यांना वाटत आहे. मात्र बहिणींनी लक्ष्यात ठेवावे, अडीच वर्षापासून राज्यात यांचे सरकार आहे. तर दहा वर्षापासून केंद्रातही यांचेच सरकार आहे. असे असताना आताच पैसे का दिले जात आहेत? असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या मुद्यावरुनही घेरले देशभरातील शेतकरी आज संकटात सापडला असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे. कापसाला, सोयाबीनला भाव मिळत नाही. दुसरीकडे तुम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करत आहात. कांदा उत्पादक शेतकरी आज त्रस्त आहे. कांद्यावर निर्यात बंदी लावला आणि कांद्याचे भाव पाडण्यात आले. दुसरीकडे कापूस आयात करून कापसाचे भाव देखील पाडण्यात आले असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे. आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची प्रगती करणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. ते कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांना हे बोलत आहेत? असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला.

Share

-