पीएम किसान, लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी गावच्या बँकेत गर्दी:लाभार्थींच्या खात्यात योजनेचे पैसे, बँक कर्मचाऱ्यांची होतेय कसरत‎

विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचे आँक्टोबर आणि नोव्हेंबर दोन महिन्यांचे ३ हजार व पी.एम.किसान योजनेच्या ४ हजार या अनुदानाचे पैसे राज्य सरकारने नुकतेच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले. राज्य शासनाने विविध योजनांचे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केलेल्या अनुदानाची रक्कम काढण्यासाठी शेतकरी सोमवारपासून बँकेत गर्दी करता आहेत. त्यामुळे नियोजन करतांना बँक कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते आहे. ऐन दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर राज्य शासनाने नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पी.एम. किसान योजना, अतिवृष्टीतील पिकांच्या नुकसानीपोटीचे अनुदान, पीक विमा आदी विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. ते पैसे काढण्यासाठी तालुक्यातील औराळा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या शाखेत गर्दी केली. या बँकेत परिसरातील १० ते १५ गावांमधील शेतकऱ्यांचे खाते आहेत. राज्य शासनाच्या अनुदानाचे पैसे खात्यावर जमा झाल्याचे मेसेज लाभार्थ्यांना आल्याने हे पैसे काढण्यासाठी शेतकरी गर्दी करता आहेत. गावात एकमेव राष्ट्रीयकृत बँक एकतर औराळा मोठ्या बाजारपेठेचे गाव असताना देखील इथे राष्ट्रीयकृत बँक नाही. येथे एकमेव जिल्हा बँकेची शाखा आहे. त्यात शाखा व्यवस्थापक व अन्य एक असे दोनच तीन कर्मचारी आहेत. अशात गर्दी वाढल्याने या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी शाखा व्यवस्थापकांना मोठी कसरत करावी लागते, तर महिला व वृद्धांना बराच वेळ ताटकळत थांबावे लागले आहे. दोन ते तीन दिवसांत गर्दी ओसरेल ^एका खातेदाराचे तीन ते चार बँकेत खाते आहे. व शासनाच्या अनुदानाची रक्कम आधार नुसार होते. अनेक लाभार्थ्यांना बँकेचे एसएमएस येत नाही. त्यामुळे अनुदानाचे पैसे आले की, नाही हे बघण्यासाठी देखील अनेक खातेदार बँकेत येतात त्यामुळे गर्दी होते आहे. दोन-तीन दिवसात गर्दी ओसरले. कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होतेय. योगेश पारवे, व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँक औराळा

Share

-