आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन:ढासळती कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचार, शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार

राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरू होत आहे, तर 10 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तसेच कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा, बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट लाटल्याप्रकरणी कोर्टाने 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावलेले माणिकराव कोकाटे या राष्ट्रवादीच्या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आग्रही राहणार आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणासह महिलांच्या सुरक्षेचा मुद्द्यांवरही सरकारला जाब विचारला जाणार आहे.

Share