ट्रम्प यांनी व्हॅक्सिन विरोधक केनेडींची आरोग्य मंत्रिपदी केली नियुक्ती:माजी राष्ट्राध्यक्षांचे पुतणे, यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करत आहेत. ट्रम्प यांनी गुरुवारी रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांची अमेरिकेचे पुढील आरोग्य सचिव म्हणून नियुक्ती केली. त्याaच्याकडे यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेस (एचएचएस) ची जबाबदारी असेल. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून ही माहिती दिली. ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले की- रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांची आरोग्य आणि मानव सेवा (HHS) सचिवपदी नियुक्ती करताना मला आनंद होत आहे. अमेरिकन नागरिकांवर औषध कंपन्यांकडून दीर्घकाळ अत्याचार होत आहेत. सर्व अमेरिकन लोकांची सुरक्षा आणि आरोग्य ही कोणत्याही सरकारची प्राथमिकता असते. केनेडी यांच्या नेतृत्वाखाली, HHS हे सुनिश्चित करेल की प्रत्येकजण हानिकारक रसायने, कीटकनाशके आणि औषधी उत्पादनांपासून संरक्षित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024ची राष्ट्राध्यक्षीय निवडणूक जिंकली आहे. पुढील वर्षी 20 जानेवारीला ते राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. केनेडी यांनीही गेल्या वर्षी डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारीचा दावा केला होता. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकही अपक्ष म्हणून लढवली होती. केनेडी ज्युनियर लसीला विरोध करतात रॉबर्ट एफ. केनेडी जूनियर हे अमेरिकेचे 35वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे पुतणे आहेत. त्यांचे वडील रॉबर्ट एफ. केनेडी ॲटर्नी जनरल होते. केनेडी हे वॉटरकीपर अलायन्सचे संस्थापक आहेत, हा जगातील सर्वात मोठे स्वच्छ पाणी समर्थक गट आहे. केनेडी हे लसीकरणाला विरोध करणारे प्रमुख कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. कोविड-19 च्या काळातही त्यांनी अमेरिका आणि जगभरातील लसीकरणाला विरोध केला होता. पुढील आरोग्य मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर केनेडी म्हणाले की, आपल्याकडे जुनाट आजार दूर करण्याची संधी आहे. HHS च्या 80 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. तुलसी गबार्ड यांना राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे प्रमुख केले ट्रम्प यांनी हिंदू नेत्या तुलसी गबार्ड यांच्याकडे राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदाची जबाबदारी दिली आहे. बुधवारी बायडेन यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर तुलसी या पदाचा कार्यभार स्वीकारतील. त्या एव्हरिल हेन्सची जागा घेतील. तुलसी गबार्ड (43) या अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार आहेत. गबार्ड यांनी वयाच्या 21व्या वर्षी हवाईमध्ये त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली. डेमोक्रॅटिक पक्षाकडून त्या 4 वेळा खासदार राहिल्या. तुलसी या आधी बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या होत्या. गेल्या महिन्यातच त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. तुलसीशिवाय ट्रम्प यांनी आणखी दोन व्यक्तींना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. फ्लोरिडाचे सिनेटर मार्को रुबिओ यांना परराष्ट्र सचिव आणि मॅट गेट्झ यांना ॲटर्नी जनरल बनवण्यात आले आहे. तुलसी गबार्ड मूळच्या भारतीय नाहीत तुलसी यांना कधी कधी त्यांच्या नावामुळे भारतीय म्हटले जाते. पण त्या भारतीय वंशाच्या नाहीत. हे त्यांनी स्वतः अनेकदा सांगितले आहे. त्यांचा जन्म सामोअन अमेरिकन कुटुंबात झाला. त्यांचे वडील कॅथोलिक होते. आई देखील ख्रिश्चन होती जिने नंतर हिंदू धर्म स्वीकारला. तुलसीसुद्धा सुरुवातीला ख्रिश्चन होत्या, पण नंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला.

Share