ट्रम्प व्यापार कराला प्रत्युत्तर, कॅनडात स्टोअरमधून हटवले अमेरिकी मद्य…:अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्पविरोधात कॅनडा-मेक्सिको

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कॅनडा, मेक्सिको आणि चीनविरोधात लावलेल्या व्यापार करामुळे ट्रेड वॉर सुरू झाले आहे. ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी अमेरिकी टेरिफ धोरणाला प्रत्युत्तर देत अमेरिकी उत्पादनांवर २५% कर आकारला आहे. त्यात मद्य, फर्नीचर आणि संत्र्याच्या रसाचा समावेश आहे. ट्रूडो म्हणाले, असे व्हावे,अशी आमची इच्छा नव्हती. मात्र, आम्ही झुकणार नाहीत. त्यांनी कॅनडियन नागरिकांना अमेरिकेचा दौना न करणे आणि कॅनडाच्या लेबलची उत्पादने खरेदी सुरू करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांच्या टेरिफमुळे ओंटारियो आणि ब्रिटिश कोलंबियात अमेरिका आणि ब्रिटिश कोलंबियात अमेरिकी उत्पादनांवर निर्बंध घालण्याची प्रक्रिया सुरू झाली. ओंटारियोची सर्वात मोठी मद्य उत्पादक कंपनी लिकर कंट्रोल बोर्डने(एनसीबीओ) अमेरिकी उत्पादने हटवणार असल्याचे म्हटले अाहे. सीमेवर सैनिक तैनात करणार मेक्सिको, ट्रम्प टेरिफ स्थगित मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शिनबाम म्हणाल्या, ट्रम्प एक महिन्यांपर्यंत २५% टेरिफवर स्थगितीसाठी सहमत झाले आहेत. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर नमूद केले की, शिनबाम यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी फेंटेनाइल व अवैध स्थलांतरीत रोखण्यासाठी सीमेवर १० हजार मेक्सिकन सैनिकांच्या तैनातीस सहमत झाला आहे. आता युरोपीय युनियनलाही ट्रम्पची टेरिफ धमकी ट्रम्प यांनी आता युरोपीय संघटनेलाही(ईयू) नवा व्यापार कर लादण्याची धमकी दिली आहे. त्यांनी सांगितले की, ईयूसोबत अमेरिकेची व्यापारी तूट वाढली आहे आणि युरोपने जास्त अमेरिकी उत्पादने आयात केली पाहिजेत. मात्र, ट्रम्प यांनी पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबतच्या चांगल्या संंबंधाचा हवाला देत ब्रिटनप्रति मवाळ भूमिका घेतली. परंतु, टेरिफची शक्यता खुली ठेवली.
ट्रॅम्पच्या टेरिफमुळे अमेरिकेतील अनेक सहकारी एकाकी, चीन संधीचा फायदा उचलण्याच्या तयारीत ट्रम्पने चीनी उत्पादनांवर १० % टेरिफ लावला आहे. हे टेरिफ चीनी फेंटानाइलवर प्रतिबंधासाठी लावले आहे, व्यापार घाट्यामुळे नाही. चीनने संयमित प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्पने प्रचारात चीनवर ६०% टेरिफ लावण्याचे जाहीर केले होते, परंतु सध्या लावलेला १० % शुल्क त्यापेक्षा कमी आहे. तज्ज्ञांनुसार, ट्रम्पने कॅनडा आणि मेक्सिकोसारख्या अमेरिकन सहयोगींवर जास्त शुल्क लावून त्यांना एकाकी केले आहे. चीनने या परिस्थितीचा फायदा घेत या देशांसोबत आपले संबंध मजबूत करण्याचे प्रयत्न वाढवले आहेत. ट्रम्प प्रशासनाने विदेशी सहाय्य थांबवल्यामुळेही चीनला फायदा झाला आहे. यूरेशिया ग्रुपचे विश्लेषक जेरमी चान म्हणाले की, चीनला काही खास करण्याची गरज नाही. ट्रम्प धोरणांमुळे चीन मोठा खेळाडू बनला आहे.

Share