उद्धव ठाकरेंना मुल्ला-मौलानांचे पाय चाटायचे आहेत:नीतेश राणे यांचे वादग्रस्त विधान, राहुल गांधीवरही केली टीका
भाजप आमदार नीतेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उबाठा ही मुस्लिम लीगची बी टीम झाली असून उद्धव ठाकरे यांनी आमच्या धर्मगुरू आणि महंतांना न भेटता मुल्लांचे आणि मौलानाचे पाय चाटायचे आहेत, असे नीतेश राणे म्हणाले. नीतेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद उफळण्याची शक्यता आहे. सदाभाऊ खोत देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरेला कोणावरही बोलण्याची मुभा दिली आहे का? असे म्हणत उद्धव ठाकरे काही बोलला की ठाकरी भाषा आणि दुसरे कोण बोलले की संस्कार? अशा शब्दांत नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. काय म्हणाले नीतेश राणे?
ठाकरे गट मुस्लिम लीगची बी टीम झाली असून त्यांना हिंदूंची मते नको आहेत. त्यांना सर तनसे जुदा बोलणारे, अल्लाह हू अकबर बोलणारे, हिरवा गुलाल उडवणारे हवे आहेत. उद्धव ठाकरे यांना आमच्या धर्मगुरू आणि महंतांना न भेटता मुल्लांचे आणि मौलानाचे पाय चाटायचे आहेत, असे वादग्रस्त टीका नीतश राणे यांनी केली. राहुल गांधी हिंदुंमध्ये फूट पाडणारा सर्वात मोठा एजंट
नीतेश राणे यांनी पुढे बोलताना काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. काँग्रेस ही सुद्धा मुस्लिम लीगची बी टीम आहे. हिंदुंना जाती-जाती मध्ये वाटून इस्लाम राज्य तयार करायचे आहे. राहुल गांधींनी त्याची सुपारी घेतली आहे. मुस्लिम समाजातील जातींबाबत राहुल गांधींनी कधी आरक्षण मागितले नाही. राहुल गांधी आमच्या देशातील हिंदुंमध्ये फूट पाडणारा सर्वात मोठा एजंट आहे, असे नीतेश राणे म्हणाले. हे ही वाचा… आम्ही कुठे खाल्ले त्याचे पुरावे द्या:उद्धव ठाकरेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर, आघाडीच्या पंचसूत्रीवरही केली टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पूर्ण बातमी वाचा… बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला जीवे मारण्याची धमकी:मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधीही सलमान खानला लॉरेन्स गँगकडून अनेकदा धमक्या आल्या आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच आता शाहरुख खानला देखील धमक्या आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. पूर्ण बातमी वाचा…