उद्धव ठाकरे यांच्या हातात सभेत दाखवण्यापुर्ती रुद्राक्षाची माळ:तर तोंडी औरंगजेबाचा जप; हिंदुत्ववादी ढोंगी म्हणत आशिष शेलारांची टीका

उद्धव ठाकरे हे सभेत दाखवण्यापूरती हातात रुद्राक्षाची माळ घेतात, त्यांच्या तोंडात कायम औरंगजेबाचा जप सुरू असतो, असा आरोप करत मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्ववादी ढोंगी, असे देखील म्हटले आहे. महाराष्ट्रात ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यावधी भाविक कुंभमेळ्यात पवित्र स्नान करून आले, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे मंत्री आशिष शेलार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व वादाच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला. आयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यावधी लोकांनी तेथे दर्शन घेऊन आले असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा सिनेमाला मात्र महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यावधी लोकांनी तो पाहिला असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. आशिष शेलार यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कोट्यवधी श्रध्दाळू दर्शन करुन आले.
आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील “छावा” सिनेमा आला
महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी लोकांनी तो पाहिला… !
“छावा” वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी आणि त्यांचा “सामना” सोडून
जगभरातील लिहिणारे, बोलणारे बोलत आहेत.. स्वागत करीत आहेत.
कुंभमेळा भरला.. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी भाविक सहभागी होऊन पवित्र स्नान करुन आले. सभेत दाखवण्यापुर्ती हातात रुद्राक्षाची माळ घाली
औरंगजेबाचा जप ज्यांच्या सदैव तोंडी… ओळखलेत का?
महाराष्ट्रातील ते हिंदुत्ववादी ढोंगी ?

Share