उद्धव ठाकरेंनी बांधलेले एकतरी शाळा कॉलेज आहे का?:सख्खा भाऊ अपघातात गेला, तेव्हा हॉस्पिटल बांधणार होते, बांधले का?, नारायण राणेंचा हल्लाबोल

सिंधुदुर्ग येथील मालवण येथे बोलताना भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांचा सख्खा भाऊ लोणावळ्यात गेला. तेव्हा सांगितले होते आम्ही लोणावळा येथे स्मारक बांधणार, हॉस्पिटल बांधणार.. बांधले का रे? असा सवाल त्यांनी उपस्थित करत टीका केली आहे. हा माणूस साहेबांमुळे वाचतो नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात एखादी शाळा किंवा कॉलेज तरी काढले आहे का? तर नाही. कोरोना काळात उद्धव ठाकरे ठेकेदार निघत असताना 15 टक्के कमिशन घेतले. बाळासाहेबांना मी शब्द दिलेला, शपथ घेतली, म्हणून उद्धव ठाकरे नेहमी वाचतो. माझ्यानंतर उद्धव आणि आदित्य काही बोलले तर काही होणार नाही हा शब्द त्यांनी घेतला होता. हा माणूस साहेबांमुळे वाचतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गरिबांना पाच किलो धान्य दिले का? मोदींनी देशातील अनेक कुटुंबांना अन्न धान्य दिले, असेही नारायण राणे म्हणाले. शिवसेना काहीही करू शकत नाही पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, साहेबांचे शिवाजी पार्कवरचे स्मारक पाहा. तुम्हाला होत नाही तर सांगा आम्ही बांधू. ही शिवसेना काहीही करू शकत नाही आणि मला मुख्यमंत्री करा म्हणतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद करणार म्हणतो, तू दुसरे काय करणार? लाडकी बहीण योजनेमुळे गावागावात महिला ओवाळत आहेत. शिंदे साहेबांचे आभार मानतात. शरद पवारांवर टीका करताना नारायण राणे म्हणाले, शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, ते म्हणतात आता लाडकी बहीण योजना यांना आठवली. त्यांनी अशी योजना सुरू केली का? ते म्हणतात परत सरकार आले तर आपल्याला विकास करता येईल. तेव्हा का नाही केला? आज लोक प्रचाराला येतात, कौतुक करतात, वाह.. हायवे झाला म्हणून, मोपाही आहे आणि चिपी देखील आहे, असेही नारायण राणे म्हणाले.

Share