उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही:भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं पण उद्धव ठाकरेंच्या समोर फक्त कुटुंब आहे. त्यांची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही वचननामा जाहीह करण्यात आला. भाजप, शिंदे गटावर टीका करतानाचा उद्धव ठाकरे यांनी अनेक घोषणा केल्या. मात्र त्यांच्या याच जाहीरनाम्यावरून भाजपकडून टीका करण्यात आली आहे.
नेमके काय म्हणाले बावनकुळे? चंद्रशेखर बावनकुळे ट्विटमध्ये म्हणाले की, अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. उद्धव ठाकरे यांचा वचननामा जाहीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीचा आपला वचननामा जाहीर केला. मुलांना मुलींसारखेच मोफत शिक्षण देण्यासह कोळी बांधवांचा त्यांना हवा असणारा विकास, गृहनिर्माण धोरण ठरवणे, मुंबईसारखाच महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांतील झोपडपट्ट्यांचा विकास, मुंबईतील पळवलेले वित्तीय केंद्र नव्याने धारावीत उभारू अशी विविध आश्वासने ठाकरे गटाने या वचननाम्याद्वारे दिली आहेत. विशेषतः मुंबईकरांना सागरी पुलाचे दिलेले वचन पूर्ण केल्याचा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. वाचा सविस्तर

Share