विदर्भात महिलांची नारी शक्ती विजय संकल्प यात्रा:महायुतीने महिलांसाठी केलेली दमदार कामगिरी सांगणार

महिलांचा विकास हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा गाभा आहे. महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सुरक्षिततेसाठी, आणि स्वावलंबनासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मात्र महाविकास आघाडीने आपल्या कार्यकाळात महिलांच्या विकासाच्या दिशेने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही असे सांगतानाच महाराष्ट्रातील महिलांसाठी महायुतीने केलेली दमदार कामगिरी सांगण्यासाठी १७ ते १९ विदर्भात महिलांची नारी शक्ती विजय संकल्प यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपा महिला आघाडीच्या अर्चना डेहनकर आणि प्रगती पाटील यांनी पत्र परिषदेत दिली. महिला सक्षमीकरणासाठी महायुतीने मोठे योगदान दिले अाहे. महिला सुरक्षेसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्स: महिलांविरोधी गुन्ह्यांवर जलद न्याय देण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना केली आहे. कन्या शिखर योजनेतून मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते, मुलींना मोफत सायकल योजनेतून ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी सायकलींचे वितरण केले जाते, महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे, मातृत्व लाभ योजनेतंर्गत गरोदर महिलांना आर्थिक मदत आणि मोफत आरोग्य तपासणी, ग्रामीण भागात महिलांसाठी मोफत औषधोपचार आणि सल्लामसलत, ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वितरण केले जाते. अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपये देण्यात आले. महायुतीचे सरकार आल्यास २१०० रूपये देण्यात येणार आहे.

Share

-