विधान परिषदेतील चर्चेत महायुती सरकारला घोषणांवरून घेरले:90 हजार कोटींच्या मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाला दिले फक्त 61 कोटी- दानवे

मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान बदलणारा मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रकल्प ३० हजार कोटींवरून ९० हजार कोटींवर गेला आहे. मात्र, त्यासाठी काही महिन्यांपूर्वी फक्त ६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाची एक वीटही रचली गेली नाही. महायुती सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडत आहे, असा आरोप विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.मंगळवारी २६० च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी शेतकरी आत्महत्या, पीक विमा, विद्यार्थी, शेतमालाचा हमी भाव अशा अनेक मुद्यांवरून सरकारला घेरले. ते म्हणाले की, मराठवाड्याला २३ टीएमसी पाणी देण्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प आहे. जाहीर झाला तेव्हा त्यावरील खर्च ३० हजार कोटींचा होता. आता या त्याचा खर्च ९० हजार कोटींवर गेला आहे. १६ सप्टेंबर २०२३ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४६ हजार कोटी रुपयांची घोषणा झाली. फार आवाज उठवल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ६१ कोटींची तरतूद झाली. देण्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प आहे. जाहीर झाला तेव्हा त्यावरील खर्च ३० हजार कोटींचा होता. आता या त्याचा खर्च ९० हजार कोटींवर गेला आहे. १६ सप्टेंबर २०२३ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४६ हजार कोटी रुपयांची घोषणा झाली. फार आवाज उठवल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ६१ कोटींची तरतूद झाली. मेरी संस्थेच्या प्रस्तावाला मराठवाड्यात विरोध करणार मेरी संस्थेच्या माध्यमातून जायकवाडी धरणातील पाणी जवळपास १३ टक्के करण्याचा डाव रचला जात आहे. जायकवाडी ६८ टक्के भरलेले असताना, मेरी संस्थेने काही लोकांना हाताशी धरून ५५ टक्के पाणी असल्यावर पाणी सोडण्याचा अहवाल दिला आहे. अशा प्रस्तावाला मराठवाड्यातील जनता विरोध करणार आहे, असेही दानवे म्हणाले.

Share