डिझाईन क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीने बघा:बी. पी. पाटील महाविद्यालयात विनायक कुलकर्णी यांचे प्रतिपादन‎

डिझाईन क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी याकडे सकारत्मक दृष्टीने बघावे, असे आवाहन एमआयटी कॉलेजचे सहयोगी विनायक कुलकर्णी यांनी केले. वैनतेय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स संचलित बी. पी. पाटील महाविद्यालयात शनिवारी आयोजित डिझाईन क्षेत्रात नवीन संधी या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते सेमिनारला प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटी कॉलेजच्या प्रणाली बनकर, बी.पी. पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत नाईकवाडे उपस्थित होते. डिझाईन म्हणजे काय, डिझाइनचा वापर या विषयासंदर्भात सखोल माहिती व डिझाइनच्या प्रकाराबाबत माहिती देताना कुलकर्णी म्हणाले की, डिझाइनचा वापर अनेक क्षेत्रांत केला जातो. प्रॉडक्ट डिझाइनचा आणि त्याचाच एक भाग असून घरातील फ्रीज हे एक उदाहरण असून त्यामध्येही पूर्वीपेक्षा अधिक गतीने बदल होत आहे. आता काळानुसार डिझाइनमध्ये बदल होत असून नवनवीन डिझाईन रोज तयार होत आहे. याचा वापर आता शिक्षणात होत आहे. अनेक जण या क्षेत्रात नोकरी करतात. काही जण आपला स्वतःचा व्यवसाय करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. इंटेरियर डिझाइनच्या वापरामुळे अनेक घरांमध्ये आकर्षक बदल होत आहे. अनेक डिझायनर आता चांगले पैसे कमवत आहे, हे एक चागले उदाहरण आहे. गेमिंग व ग्राफिक आणि अॅनिमेशन डिझाइनला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यातूनही अनेक रोजगार उपलब्ध होत आहे. फॅशन डिझाईन, टेक्स्टाइल डिझाईन, ऑटोमोबाइल डिझाईन या क्षेत्रात विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात, असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्षा कोल्हे यांनी आभार मानले.

Share