‘आम्हाला खूप आशा होती…’:प्रियांका चोप्राच्या आई मधु म्हणाल्या- जेव्हा मुलीने डेब्यू केला, तेव्हा इंडस्ट्रीतील काळे सत्य कळले

प्रियांका चोप्रा ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत तिने आपला ठसा उमटवला आहे. मात्र, हा मार्ग प्रियांकासाठी इतका सोपा नव्हता. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीची आई मधु चोप्राने केला आहे. त्या म्हणतात की जेव्हा मुलगी प्रियांकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा त्यांना इंडस्ट्रीतील काळे सत्य कळले. ब्रेकिंग स्टिरीओटाइप्ससोबतच्या संभाषणात, प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांनी अभिनेत्रीच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या, ‘फिल्म इंडस्ट्री आमच्यासाठी पूर्णपणे नवीन होती. आम्हाला खूप आशा होत्या. मला ते वाईट किंवा अवघड ठिकाण वाटले नाही, कारण आमच्या मनात कोणतेही नकारात्मक विचार नव्हते. जेव्हा आम्ही खरोखर इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा आम्हाला त्यातील गोंधळाची जाणीव झाली, जी सुरुवातीला थोडी निराशाजनक होती. मधु चोप्रा म्हणाल्या, ‘हे सर्व पाहून आम्ही घाबरलो. मात्र, इतक्या अडचणी येऊनही प्रियांकाने हार मानली नाही. त्यामुळे आमची भीतीही कमी झाली. मला आठवते की एके दिवशी प्रियांकाने आम्हाला बसवले आणि म्हणाली की आई, तू मला चांगले ओळखते, त्यामुळे या सर्व फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. मग हळूहळू सगळं सुरळीत झालं. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रियांका 2023 मध्ये ‘सिटाडेल’मध्ये दिसली होती. ती आता ‘हेड्स ऑफ स्टेट’ या ॲक्शन-कॉमेडी सिनेमाची तयारी करत आहे. याशिवाय ती ‘सिटाडेल 2’ मध्येही काम करत आहे.

Share

-