उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरेंनी भान ठेवावे:संजय राऊत यांचा निशाणा; गुजराती व्यापाऱ्यांची स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोप

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राज ठाकरे यांनी भान ठेवावे, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे हे गुजरामधील दोन व्यापाऱ्यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत. त्यांच्यावर राज ठाकरे हे टीका करर असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोग निष्पक्ष पणे वागत नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. राज ठाकरे हे दुसरे मोराजी देसाई आहेत. आम्हाला मोरारजी देसाईंची आठवण झाली, हे फार दुर्दैव आहे. ते फार मोठे नेते होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या विषयी बोलताना राज ठाकरे यांनी थोडेसे भान ठेवावे. ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेतच मात्र महाराष्ट्रावर डल्ला मारणाऱ्यांच्या विरोधात त्यांची लढाई सुरू आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी राज त्यांच्यावर टीका केली. विक्रोळीत वारंवार एखादा नेता सभा घेत असला तरी या मतदारसंघात आमचाच पक्ष निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी केला. विक्रोळीत दोन सभा काय? त्यांनी येथेच घर करून राहावे, मात्र तरी देखील तेथे सुनील राऊत निवडून येतील असा दावा देखील राऊत यांनी केला आहे. राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलण्यास सांगण्यात आले आहे. राज ठाकरे जे बोलत आहेत ती स्क्रिप्ट त्यांना गुजरात मधून आली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सांगितले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. दारामध्ये शिवसेनेचा जन्म, तेथे उमेदवार द्यावाच लागेल कोणत्या पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी, हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र, दादर येथे शिवसेनेचा जन्म झाला आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अनेक भावनिक विषय असतात. त्यामध्येच दादर देखील एक मतदार संघ आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल, असा दावा देखील राऊत यांनी केला. शिवसेनेचा जन्मच त्या मतदारसंघात झाला. शिवसेनेचा पहिला पत्ता देखील ’77-ए, रानडे रोड’ हा त्या मतदारसंघातील आहे. त्यामुळे त्या मतदारसंघात लढावेच लागणार होते, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून त्यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी दिलेले उमेदवाराचे समर्थन केले. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. राम मंदिर निर्माणातील मोदींचा ‘राजकीय इंटरेस्ट’ संपला:त्यामुळे भाजपने देव फिरवला; रामाचा नवा वनवास सुरू झाला आहे काय? ठाकरे गटाचा निशाणा राममंदिराचे राजकारणच चालत नाही म्हटल्यावर मोदी–शहांच्या तोंडून रामनाम येणेही बंद झाले. लोकसभा निकालानंतर मोदी एकदाही अयोध्येत गेले नाहीत. राम मंदिर निर्माणातील मोदींचा ‘राजकीय इंटरेस्ट’ संपल्याचा परिणाम असा झाला की, राममंदिराचे काम रखडून पडले. मोदी साहेबांनी देव बदलला. त्यामुळे भाजपने देव फिरवला. श्रीराम पुन्हा वनवासी होतात की काय, अशी भीती त्यामुळे निर्माण झाली. रामाची निवास व्यवस्था अपुरी आहे. रामाचे छत गळते आहे व घराला कुंपण नाही. दरबाराचे कामही अपूर्ण. त्यामुळे रामाची अवस्था अवघडल्यासारखी झाली. दिल्लीच्या राजाने देव बदलल्याचा फटका अयोध्येच्या राजाला बसला. भाजपला आता श्रीराम नकोसे झाले! रामाचा नवा वनवास सुरू झाला आहे काय? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. या बाबत ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या माध्यमातून भाजपवर आणि मोदींवर निशाणा साधला. पूर्ण बातमी वाचा… उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘बाण’ निघून गेला, आता फक्त ‘खान’ उरला:मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वर्सोवा विधानसभा मतदारसंघात हारून खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता ठाकरे गटाच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ खान राहिले आहेत, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पूर्ण बातमी वाचा…

Share