रोहित ऑस्ट्रेलियात एक कसोटी मिस करण्याची शक्यता:वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या 2 सामन्यांपैकी एक खेळणे कठीण; 22 नोव्हेंबरपासून मालिका
भारताचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातील कसोटीतून बाहेर जाऊ शकतो. त्याने बीसीसीआयला कळवले आहे की वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोनपैकी कोणत्याही कसोटीत खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी वैयक्तिक प्रकरण मिटले तर तो सर्व सामने खेळेल. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे. विराट...