महिमाच्या चेहऱ्याला अपघातात इजा:म्हणाली-अजय देवगणला हे गुपित ठेवण्यास सांगितले; बॉलिवूड बहिष्काराची होती भीती
महिमा चौधरी कमबॅक करत असून, ती ‘द सिग्नेचर’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटाद्वारे ती आठ वर्षांनी चित्रपटांमध्ये पुनरागमन करतेय. दरम्यान, एका मुलाखतीत महिमाने 1999 मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या रस्ता अपघाताविषयी सांगितले. ‘दिल क्या करे’ चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी महिमा लोकेशनवर जात असताना तिच्या कारला ट्रकने धडक दिली. या अपघातात महिमाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती....