पुतीन यांच्या घरापासून 7 किमीवर रशियन अण्वस्त्र प्रमुखाला उडवले:युक्रेनने इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ठेवला बॉम्ब

युक्रेनसोबत ३ वर्षांपासून युद्ध लढणाऱ्या रशियाला मंगळवारी मोठा झटका बसला. त्याच्या आण्विक कार्यक्रमाचे प्रमुख जनरल इगोर किरिलोव्ह (५४) यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. राजधानी मॉस्कोतील एका अपार्टमेंटच्या गेटवर पार्क केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हा स्फोट झाला. त्या वेळी किरिलोव्ह सहायकासह अपार्टमेंटमधून बाहेर पडत होते. दोघेही ठार झाले. या स्फोटासाठी स्कूटरमध्ये ३०० ग्रॅम स्फोटके ठेवली होती. युक्रेनी गुप्तचर संस्था एसबीयूने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे निवासस्थान क्रेमलिनपासून ७ किमीवर हा स्फोट झाला. किरिलोव्ह हे पुतीन यांचे निकटवर्तीय होते. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी नक्की बदला घेऊ, असे म्हटले. युक्रेनच्या हिटलिस्टवर बडे अधिकारी रासायनिक हल्ल्याचा होता आरोप २०१७ मध्ये त्यांना अण्वस्त्रांची धुरा मिळाली. त्यांच्यावर युक्रेनमध्ये रासायनिक शस्त्रे वापरल्याचा आरोप आहे. एसबीयूचा दावा आहे की फेब्रुवारी २०२२ पासून रशियाने युक्रेनमध्ये ४८०० वेळा रासायनिक शस्त्रे वापरली. ब्रिटन व कॅनडाने यापूर्वीच किरिलोव्हवर निर्बंध लादले होते. ब्रिटन सरकारने म्हटले की, ते शोक करणार नाहीत.

Share

-