तर फडणवीसांचे 90% मंत्रिमंडळ रिकामे होईल:संजय राऊत यांचा निशाणा; बिनखात्याचे मंत्रिमंडळ म्हणत सरकारवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचाराबाबत ‘झिरो टॉलरन्स’ या घोषणेचा उल्लेख करत आहेत. वास्तविक केंद्रामध्ये नरेंद्र मोदी हे देखील अशीच ‘जुमले’ बाजी करतात. त्यामुळे त्यांचे खालचे चेले देखील तेच करत असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘झिरो टॉलरन्स’ महाराष्ट्र मध्ये राबवला तर त्यांचे 90% मंत्रिमंडळ रिकामे होईल, असा आरोप राऊत यांनी केला आहे. वास्तविक केंद्रात नरेंद्र मोदी हे सर्व भ्रष्टाचारांना आपल्या भोवती घेऊन बसले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सुद्धा महाराष्ट्रातील भ्रष्टाचारांना अवतीभोवती घेऊन बसले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र मध्ये मंत्रिमंडळात आहे, मात्र सर्वच बिन खात्याचे मंत्री असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते काय आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. राज्य मंत्रिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा त्रास असतो. तसा तास झाला तर सर्वच प्रश्नांची उत्तरे देवेंद्र फडणवीस एकटेच देणार आहेत का? असे म्हणत त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या खाते वाटपावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यामध्ये अनेक ताकतवर नेत्यांना मंत्रिपद मिळाले नाही. मात्र त्यांच्यामध्ये अडीच अडीच वर्षांचा फार्मूला ठरल्याचे ऐकू येत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. वास्तविक त्यांनी सहा महिन्यांचा फार्म्युला केला असता तर सर्वांना मंत्रीपद मिळाले असते, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे. जे जे आमच्याकडून सोडून गेले, ते सत्ता, पद आणि पैसा या मोहासाठीच गेले असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि अकार्यक्षमतेचे आरोप होते. अशा अनेकांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले असल्याचे राऊत त्यांनी म्हटले आहे. भुजबळांना वगळ्यामागे जातीचे राजकारण छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. यामागे मात्र जातीचे राज्यकारण असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची साथ सोडली. हे सगळ्यांसाठीच क्लेशदायक होते. मात्र राजकारणामध्ये ज्याला – त्याला आपल्या कर्माची फळे मिळत असतात, अशी टीका देखील राऊत यांनी केली आहे. संविधान बदलण्याची गरज का? उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, “संविधानावर लोकसभेत चर्चा झाली, आता राज्यसभेत चर्चा होईल. सरकार संविधानाच्या विरोधात काम करत आहे. मग ती न्यायव्यवस्था असो, निवडणूक आयोग असो, राजभवन असो, संसद असो, जिथे जिथे सरकार राज्यघटनेबाबत भूमिका घेत आहे, ती देशाच्या हिताची नाही. वास्तविक संविधान बदलण्याची गरज का? असा वाद आज संसदेत झाला असता. मात्र, 400 ला ब्रेक लागला, म्हणून आम्ही संविधानावर चर्चा करत आहोत. झाकीर हुसेन यांचे निधन क्लेशदायक झाकीर हुसेन यांच्या निधनाबाबत राऊत म्हणाले की, “त्यांचे निधन ही देशासाठी अत्यंत हानीकारक बातमी आहे. लता मंगेशकर यांच्यानंतर त्यांचे निधन आमच्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. त्यांनी केवळ देशातच नाही तर घराघरात आपले स्थान निर्माण केले होते. संपूर्ण जग हे त्यांच्या निधानाने दुःखी आहे. त्यांचे निधन होण्याचे वय नव्हते. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.’

Share