लाडकी बहीण योजना बंद केल्याची माध्यमांनी खोटी बातमी लावली:अजित पवारांची आगपाखड; योजना बंद होणार नसल्याचा दावा

महाराष्ट्रातील राजकारणात गेम चेंजर ठरु शकणारी लाडकी बहीण योजना बंद करण्यात आली, अशी खोटी बातमी काही वृत्तपत्रे आणि चॅनेलने लावली. ही धादांत खोटी बातमी त्यांनी का लावली? हे कळायला मार्ग नाही. ही योजना अत्यंत चांगली आहे. राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. या बातम्यांवरुन अजित पवारांनी माध्यमांवर टीका केली. लाडकी बहीण योजना ही महिला व बालविकास विभागाने आणली आहे. मंत्रिमंडळाने या योजनेला मंजूरी दिली आहे. अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी लागणारी सर्व तरतूद करण्यात आली आहे. पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजेच 9 महिन्यांसाठी ही तरतूद आहे. त्यानंतर पुढच्या अर्थसंकल्पात पुढील बारा महिन्यांची तरतूद करण्यात येईल. ही योजना चालू राहणार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघात उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. आघाडी किंवा युतीमध्ये प्रत्येक पक्षाला देखील मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. मात्र, आघाडी आणि युती करतो त्यावेळी सर्वांना शंभर टक्के मनासारख्या गोष्टी घडत नसतात. प्रत्येकाला दोन पावले पुढे किंवा मागे सरकावे लागते. त्यातून थोडासा विलंब लागतो, असे म्हणत अजित पवार यांनी जागा वाटपावर प्रतिक्रिया दिली आहे. एकाच पक्षाने सर्व जागा लढवण्याचे ठरवल्यावर असे काही होत नाही. मात्र युती किंवा आघाडी जाहीर झाल्यानंतर असे घडत असते. ते आजच घडतेय असे नाही तर गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपण तसे पाहिले आहेत. तर कार्यकर्ते संभ्रमात राहतात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना ठराविक काळात जागा वाटपाचा तिढा सोडवावा लागणार आहे. यामध्ये फार लांबवले तर कार्यकर्ते संभ्रमात राहतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना चित्र स्पष्ट दिसले पाहिजे. त्यानंतर ते आणखी जोमाने कामाला लागतात, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. जे पैसे सापडले त्यांची चौकशी करा जे पैसे सापडले, त्या पैशांची चौकशी करा, त्यातून दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. चौकशीनंतरच त्याविषयी बोलायला हवे. काहीजण बिन बुडाचे आरोप करतात, असा पलटवार देखील अजित पवार यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील काही जागांसंदर्भात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र बसून चर्चा करण्यासंदर्भात काही मुद्दे होते. त्यामुळे तशी चर्चा केली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी संबंधित खालील बातमी देखील वाचा… शिवसेनेच्या कोट्यातील युतीच्या पाच जागा भाजपने खेचल्या:शिंदेचा कोटा कमी झाला का? BJP विरुद्ध ठाकरेंची शिवसेना लढतीची शक्यता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या घोषणेच्या बाबतीत भाजपने बाजी मारली आहे. पक्षाने आपल्या 99 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये शिवसेनेने लढवलेल्या पाच जागांचाही यात समावेश आहे. या वेळी या जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपला द्याव्या लागल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातील या जागा कमी झाल्या आहेत. पूर्ण बातमी वाचा… महाविकास आघाडी आज जागावाटप जाहीर करणार?:विधानसभेच्या सर्व 288 जागांवर निर्णय; संजय राऊत म्हणाले- 210 जागांवर एकमत महाराष्ट्र महाविकास आघाडीची (काँग्रेस-शिवसेना उद्धव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार) बैठक आज मुंबईत होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर वाटणी निश्चित केले जाणार आहे. पूर्ण बातमी वाचा… भाजपला मोठा धक्का:वडील युतीचे तर मुलगा आघाडीचा उमेदवार? नवी मुंबई भाजप अध्यक्ष संदीप नाईक यांचा आज शरद पवार गटात प्रवेश महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय खलबते सुरू असून पक्ष बदलण्यासाठी नेत्यांच्या उड्या देखील सुरू आहेत. यातच आता भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे नवी मुंबई जिल्हा भाजप अध्यक्ष संदीप नाईक हे आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पूर्ण बातमी वाचा… राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर:मात्र, या बड्या मुस्लिम नेत्याचे नाव नसल्याचे शरद पवार गटाची टीका अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांची नावे यादीत आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे नाव या यादीत नाही. नवाब मलिक यांच्यावर ईडीचा खटला सुरू आहे. त्यांच्या नावावर भाजपचा देखील आक्षेप आहे. यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी टोला देखील मारला आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-