उद्धव ठाकरेंची बंडखोरांवर मोठी कारवाई:पक्षविरोधी कारवायांमुळे हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बंडखोरांवर मोठी कारवाई केली आहे. हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही बंडखोरांवर कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे ठाकरे यांनी पाच नेत्यांची हकालपट्टी केली होती. त्यात भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांचाही समावेश आहे.
हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या आरोपातून ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दिड ते दोन वर्षापुर्वीच त्यांनी काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांच्या हकालपट्टीमुळे आता त्यांची विधानसभा निवडणुकीत राजकिय भूमीका काय राहणार? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी सन 2009 मध्ये शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा निवडणुक लढविली होती. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर सन 2024 मध्ये मोदीलाटेतही त्यांचा काँग्रेसकडून पराभव झाला होता. मात्र त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपामध्ये त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांना सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सुमारे दोन वर्षापुर्वी शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी काँग्रेसमधून पुन्हा स्वगृही ठाकरे गटात प्रवेश करून शिवबंधन बांधले होते. झाला होता. पुढील भूमिकेकडे लक्ष दरम्यान, सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विरोधीपक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी गेले असून त्यांचा प्रचार करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या संदर्भातील अधिकृतपत्र प्रसारित करण्यात आले आहे. या संदर्भात ठाकरे गटाचे हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला असून पक्ष विरोधी कारवायामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नंतर आता माजी खासदार वानखेडे यांची राजकिय भुमीका काय राहणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात वानखेडे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. उद्धव ठाकरे यांनी दिला होता अल्टिमेटम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा 4 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता. ठाकरे गटाच्या नेत्यांसह महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षांमध्ये अनेक नेत्यांनी बंडखोर म्हणून अपक्ष अर्ज भरले होते. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आप-आपल्या पक्षाती बंडखोर नेत्यांना शेवटची संधी देत अल्टिमेटम दिला होता. पक्षातर्फे कडक कारवाई निवडणुकीतून वेळेत नावे मागे न घेतल्यास पक्षातर्फे कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, अनेक नेत्यांनी आपली नावे मागे घेतली होती, मात्र अनेकजण आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाने या नेत्यांवर कारवाई केली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यातील इरतही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. ‘ते ठाकरे असले तर मी देखील राऊत’:संजय राऊत यांचा थेट राज ठाकरे यांना इशारा; भाजपच्या नादी लागलेला काय बोलणार? म्हणत पलटवार मनसे प्रमुख राज ठाकरे हे ठाकरे असले तरी मी देखील राऊत आहे, माझे बरेच आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत गेले आहे. बाळासाहेबांनीच घडवलेला मी राऊत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. त्यांनी मला शिकवण्याची आवश्यकता नसल्यााचे राऊत यांनी म्हटले आहे. ज्याला जी भाषा समजते, ती भाषा मी वापरत असल्याचे राऊत त्यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा… महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील:केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे स्पष्ट संकेत; राजकीय वर्तुळात चर्चा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील प्रचार सभेत आगामी काळात महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे भाषण करताना अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत तेच मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनाच आणायचे, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री पदाबाबत चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. पूर्ण बातमी वाचा…