रशियाचा युक्रेनवर ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला:6 ठार, 30 हून अधिक जखमी; ग्लाइड बॉम्ब देखील डागले

रशियाने सोमवारी युक्रेनवर ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या वेळी रशियाने युक्रेनच्या दक्षिण-पश्चिम शहरांवर ग्लाईड बॉम्बही डागले. या हल्ल्यांमध्ये सहा युक्रेन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 30 हून अधिक जखमी झाले आहेत. रशियाने लक्ष्य केलेली युक्रेनियन शहरे युद्ध क्षेत्राच्या अग्रभागी असलेल्या 1000 किमीच्या परिघात आहेत. सोमवारी झालेल्या रशियन हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाच नागरिकांपैकी बहुतांश दक्षिणेकडील मायकोलायव्ह शहरातील होते. या शहरावर रशियाने ड्रोनने हल्ला केला होता. या हल्ल्यात 45 वर्षीय महिलाही जखमी झाली आहे. याशिवाय रशियाने झापोरिझिया शहरावर 3 शक्तिशाली ग्लाईड बॉम्ब डागले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. रविवारी मॉस्कोवर युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाचा हा हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनने रविवारी रशियाच्या राजधानीवर 34 ड्रोनने हल्ला केला. युक्रेनचा दावा- रशियन लष्करी हेलिकॉप्टर नष्ट युक्रेनच्या गुप्तचर संस्थेने एक निवेदन जारी करून दावा केला की, त्यांनी एका हल्ल्यात रशियन लष्करी हेलिकॉप्टर एमआय-24 नष्ट केले. रशियाची राजधानी मॉस्कोजवळील क्लिन-5 एअरफील्डवर हा हल्ला करण्यात आला. या एअरफील्डवर हेलिकॉप्टर उभे होते. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, त्यांनी 17 युक्रेनियन ड्रोन पाडले. हे ड्रोन रशियाच्या कुर्स्क, बेल्गोरोड आणि वेरोनीज भागात पाडले गेले. रशियन केमिकल प्लांटवर युक्रेनचा हल्ला युक्रेनने शनिवारी दावा केला की त्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा रशियाच्या पश्चिमेकडील तुला शहरातील रासायनिक प्लांटला लक्ष्य केले. युक्रेनच्या स्पेशल ऑपरेशन्स फोर्स एसबीयूने सांगितले की त्यांनी हल्ल्यात 13 ड्रोनचा वापर केला होता. हल्ल्यानंतर केमिकल प्लांटमध्ये स्फोट झाला आणि धुराचे लोट पसरले. एसबीयूच्या म्हणण्यानुसार, या प्लांटमध्ये रशियन सैन्यासाठी दारूगोळा तयार केला जातो. हल्ल्यानंतर प्लांटमधून केशरी धूर निघताना दिसला. सीएनएनच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, हल्ल्यात अलेक्सिंस्काया थर्मल पॉवर प्लांटचेही नुकसान झाले आहे. या हल्ल्यात 110 केव्ही पॉवर ट्रान्समिशन लाइनचेही नुकसान झाले आहे. राजधानी मॉस्कोपासून 200 किमी दक्षिणेला हा केमिकल कारखाना आहे. सप्टेंबरमध्ये 150 ड्रोनने हल्ला केला युक्रेनने 1 सप्टेंबर रोजी 150 हून अधिक ड्रोनने रशियावर हल्ला केला. अडीच वर्षांच्या रशिया-युक्रेन युद्धात पहिल्यांदाच युक्रेनने एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोन एकाच वेळी रशियाविरुद्ध वापरला होता. रशियाची राजधानी मॉस्कोवरही युक्रेनने ड्रोन हल्ले केले. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांच्या म्हणण्यानुसार, शहरावर 11 ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये तेल शुद्धीकरण केंद्र आणि एका तांत्रिक कक्षाला लक्ष्य करण्यात आले. तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला झाल्यानंतर त्याचा स्फोट झाला. यानंतर दाट धुराचे लोट उठताना दिसत होते. रशियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनने 15 प्रांतांवर 158 ड्रोनने हल्ला केला.

Share

-