मुख्यमंत्री कोण?:निर्णय लांबल्याने देवेंद्र यांच्या नावाबाबत शंका, तावडे, मोहोळ यांचीही चर्चा
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चेनंतरही भाजप शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करू शकला नाही. त्यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असले तरी भाजप हायकमांडच्या मनात वेगळे काही आहे का? याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. प्रदेश भाजपच्या एकाही नेत्याला याबाबत मागमूस लागत नाहीय. पुन्हा संधी मिळण्यासाठी फडणवीस यांच्या जमेच्या व कमकुवत बाजूंचा आढावा… भाजपची बैठक रद्द, नाराज एकनाथ शिंदेही निघून गेले गावी भाजपच्या गटनेता निवडीसाठी गुरुवारी बैठक अपेक्षित होती. मात्र दिल्लीतून सिग्नल न मिळाल्याने ती टळली. परिणामी महायुतीच्या नेत्यांचीही बैठक झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, मुरलीधर मोहोळ या पर्यायी नावांच्या वावड्या उठल्या होत्या. गृह मंत्रालयाची मागणी पूर्ण होत नसल्याने नाराज एकनाथ शिंदे हे दरे (सातारा) गावी निघून गेले. आता ते रविवारी परततील. रविवारी महायुतीची बैठक होऊन २ डिसेंबर रोजी शपथविधी शक्य आहे. ५ डिसेंबरचीही चर्चा आहे. आरएसएसही अनुकूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघही अनुकूल असल्याने भाजप पक्षातून विरोधाचा प्रश्न नाही. नेतृत्वाला कौल देवेंद्र यांच्या नेतृत्वात भाजपला एेतिहासिक यश. जनमत त्यांच्या बाजूने असल्याने त्यांच्या नावाची चर्चा. मोदी-शाह अनुकूल देवेंद्र यांच्या नावाला मोदी-शाह अनुकूल. प्रचारातही त्यांच्या नावाचे संकेत या दोन्ही नेत्यांनी दिले. शिंदे, अजित पवार विरोध शिंदे, अजित पवारांना देवेंद्रसोबत काम करणे अडचणीचे ठरू शकते तावडे कॅशकांड विनोद तावडे यांना अडकवण्यात देवेंद्र गट सक्रिय असल्याचा संशय. त्यामुळे नेतृत्व नाराजीची चर्चा. मराठा समाजाचा विरोध मराठा समाजातून तीव्र विरोध. त्यामुळे नेतृत्व दिल्यास स्थानिक निवडणुकात फटका बसण्याची भीती.