2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा:चंद्रशेखर बावनकुळेंचे नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांना आदेश

2029 ची विधानसभा जिंकण्याची तयारी आजपासूनच करा, तयारीला लागा, असा आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रसशेखर बावनकुळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. विरोधकांच्या खोट्या गोष्टीमुळे आपण कमी पडलो
नाशिक येथे महायुतीच्या 14 पैकी 14 जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे येथील उमेदवारांचे अभिनंदन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे नाशिकमध्ये आले होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पक्ष संघटनेची बैठक घेतली पाहिजे म्हणून मी नाशिकला आलो. मी ठरवले होते आज नाशिकला आलोच आहे तर प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटणार. लोकसभेत आपण थोड्या कमी मताने मागे राहिलो. विरोधकांनी केलेला खोटारडापणा होता, त्यामुळे आपला पराभव झाला. कांदा आणि आदिवासी प्रश्न, संविधान बदल ह्या खोटारडेपणाचा विरोधकांनी बाऊ केला, विरोधकांच्या खोट्या गोष्टीमुळे आपण कमी पडलो. मोदीजी आणि आपण विकसित भारत यावर बोलत गेलो आणि खोट्या गोष्टींमुळे मागे पडले, असे म्हणत बावनकुळे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आपण लोकसभेत प्रत्येकी बूथवर 20 मतदान कमी घेतले म्हणून कमी पडलो, उशिरा पण आपला खरा विजय झाला. आपण ही लढाई स्वतः म्हणून लढलो आणि जिंकलो, महाविजय झाला. विधानसभेला आपण 149 जागा लढलो आणि 132 जागांवर जिंकलो, असे बावनकुळे म्हणाले. नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार म्हणून कोट पण शिवला
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, लाडक्या बहिणीकडून विरोधकांना मोठा धक्का दिला. नाना पटोले मशीनवर हरले बॅलेट पेपरवर जिंकले, त्यांनी मुख्यमंत्री होणार म्हणून कोट पण शिवला होता, असा टोलाही बावनकुळे यांनी नाना पटोले यांना लगावला आहे. करंजेकर आपला कार्यकर्ता उभा होता म्हणून नाना पटोले जिंकले, नाहीतर अकरा हजार मतांनी पटोले पडले असते. रोहित पवार पण बॅलेट पेपरमुळे जिंकले, आपण काही ठिकाणी कमी मताने हरलो नाहीतर आपले 143 आमदार असते, हा मोठा महाविजय असता. 2029 ची विधानसभा जिंकण्याची तयारी आजपासूनच करा
कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्या किंवा परवा नवे मुख्यमंत्री कोण हे घोषित होणार 5 तारखेला नव सरकार महायुती सरकार स्थापन होणार हे जाहीर केले आहे. आपली जबाबदारी सरकार म्हणून तीन आहे, लोकसभा आणि विधानसभा पण आता स्थानिक स्वराज्य संस्था हा मोठा विजय मिळवायचा आहे. आता नेत्यांच्या निवडणुका झाल्या, पुढचा विजय कार्यकर्त्यांची सत्ता, तुम्ही सत्तेत येणार ही जबाबदारी आता आमची. आपण कधीच मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक लढलो नाही. आता, 2029 ची विधानसभा जिंकण्याची तयारी आजपासूनच करा, तयारीला लागा, असा आदेशच बावनकुळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

Share

-