परराष्ट्र सचिव मिस्त्री सोमवारी ढाक्याला जाणार:हिंदूंवरील हिंसेचा मुद्दा मांडणार, 5 ऑगस्टनंतर भारतीय मुत्सद्द्याचा दौरा

बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार सुरू असतानाच भारताने मोठे पाऊल उचलले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री सोमवार, ९ डिसेंबर रोजी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ५ ऑगस्टला शेख हसीना सरकार उलथवून टाकल्यानंतर एखाद्या बड्या मुत्सद्द्याचा हा पहिलाच दौरा असेल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, दोन्ही पक्षांमध्ये अलीकडील घटनांवर चर्चा होईल. बांगलादेशची हिंदू संस्था सनातनी जागरण जोतचे प्रवक्ते चिन्मय प्रभू यांच्या अटकेवर जैस्वाल म्हणाले, बांगलादेश न्यायिक अधिकारांचे रक्षण करेल, अशी आशा आहे. ३ डिसंेबर रोजी हायकोर्टात जामीन याचिकेवर सुनावणीवेळी प्रभू यांची एकाही वकिलाने बाजू मांडली नव्हती. ६ वर्षांनंतर बांगलादेश-पाक थेट उड्डाण कराची| बांगलादेशचे उपउच्चायुक्त महाबुल आलम यांनी सांगितले की, सहा वर्षांनंतर पाकिस्तान व बांगलादेशदरम्यान जानेवारीपासून थेट विमानसेवा सुरू होईल. नोव्हेंबरमध्ये ५३ वर्षांत पहिल्यांदा कराचीहून पाकिस्तानी मालवाहू जहाज चितगाव बंदरावर पोहोचले.
ढाक्याला एअर इंडियाचे विमान नाही बांगलादेशातील हिंसाचारामुळे सध्या कोलकाता ते ढाका थेट विमानसेवा सुरू होणार नसल्याचे एअर इंडिया एक्स्प्रेसचे एमडी आलोक सिंह यांनी माध्यमांना सांगितले. या विमान कंपनीने सप्टेंबरपासून कोलकाता-ढाका थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. कोलकात्यातील बांगलादेशच्या सहायक उच्चायुक्तांनी भारतीयांच्या व्हिसांची संख्या कमी केली आहे. शुक्रवारपासून व्हिसा कमी केले आहेत. बांगलादेशने आपल्या कोलकाता कार्यालयातून दोन राजनयिकांना परत बोलावले आहे. बांगलादेशने ३ डिसेंबरपासून आगरतळातील स. उच्चायुक्तांकडून व्हिसा देण्याची प्रक्रिया थांबवली आहे.

Share

-