आघाडीच्या फेक नरेटीव्हला महायुतीचे प्रत्युत्तर:मारकडवाडीत भाजपची सभा; गावातील नागरिकांनी आधार कार्ड दाखवले

राज्यातील मारकडवाडी गावातून महाविकास आघाडी फेक नरेटीव्ह पसरवत असल्याचा आरोप महायुतीच्या वतीने करण्यात आला आहे. या विरोधात आता महायुती देखील मैदानात उतरली आहे. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये मारकडवाडी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत महाविकास आघाडीच्या वतीने फेक नरेटीव्ह पसरवण्यात येत असल्याचा आरोप भाजपेने केला आहे. महायुतीच्या वतीने आयोजित या सभेला सर्वसामान्य नागरिकांनी येऊ नये, यासाठी मोहिते पाटील यांनी त्यांचे गुंड ठिकठिकाणी उभे केले असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे. निवडणुकीत देखील मोहिते पाटील यांनी गुंडगिरीचा वापर केला असल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला आहे. मात्र, येथे मारकडवाडी गावातील नागरिक उपस्थित आहेत. ते काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभे राहतात. रनजीतसिंह मोहिते पाटील यांच्याकडून गावागावात पैसे वाटण्यात आल्याचा आरोप देखील सातपुते यांनी केला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्याला त्यांच्या गुंडांनी धमक्या दिला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सोनाली शिरतोडे यांचा सत्कार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गुंडांच्या विरोधात लढणाऱ्या सोनाली शिरतोडे या भाजपच्या कार्यकर्ता असलेल्या महिलेचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Share

-