भाजपच्या विजयानंतर गौतम अदानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला:सागर बंगल्यावर दोघांमध्ये दीड तास खलबते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती गौतम अदानी यांची भेट भेट झाली आहे. फाडणवीस यांची भेट घेण्यासाठी गौतम अदानी हे सागर बंगल्यावर पोहोचले होते. राज्यातील उद्योगांच्या विकासासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली असून सुमारे दीड तास ही चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. धारावी हा एक महत्त्वाचा प्रकल्प गौतम अदानी यांचा आहे. धारावी प्रकल्पावरून विरोधकांनी देखील गौतम अदानी यांच्यावर निवडणुकांच्या प्रचार काळात जोरदार टीका केली होती. याच धारावी प्रकल्पासंदर्भात देखील चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गौतम अदानी हे फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी दाखल झाले होते. उद्योगपती गौतम अदानी हे साधारण 10.30 च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी दाखल झाले होते. जवळपास दीड तास देवेंद्र फडणवीस आणि गौतम अदानी यांच्यात चर्चा झाली आहे. यात नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला गौतम अदानी उपस्थित नव्हते. उद्योगपती अंबानी पासून ते बॉलीवूडमधील मोठे कलाकार मंडळी उपस्थित होते. यात गौतम अदानी मात्र उपस्थित नसल्याने ही सदिच्छा भेट देखील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, तर काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच महायुती व भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारांवेळी धारावीचा चेहरामोहरा बदलणार व प्रत्येकाला राहण्यासाठी हक्काचे घर असणार असे आश्वासन दिले होते. या संदर्भात देखील अदानी आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली असू शकते. धारावी विकास प्रकल्प हा गौतम अदानी यांना मिळाला आहे. यावरून महाविकास आघाडीने देखील त्यांच्यावर टीका केली होती. धारावी गौतम अदानी यांच्या घशात घालण्याचे काम महायुती करत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात येत होती. तसेच संपूर्ण महाराष्ट्रच गौतम अदानी यांना विकायचा असल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीने केला होता. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात गौतम अदानी हे नाव चर्चेत होते.

Share

-