राहुल गांधी यांच्या आजी संविधान विरोधी होत्या का?:संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदे कडाडले; भाषणादरम्यान काँग्रेसचा गोंधळ

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना देशाचे ‘महान सपूत’ असे संबोधले होते. मग इंदिरा गांधी या संविधान विरोधी होत्या का? असा प्रश्न शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केला. लोकसभेमध्ये सुरू असलेल्या संविधानावरील चर्चे दरम्यान डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत फेक नरेटीव्हच्या माध्यमातून मतदारांना संभ्रमित केल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेतील भाषणादरम्यान राहुल गांधी यांचे नाव घेत त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे लोकसभेच्या नियमानुसार त्यावर बोलण्याची परवानगी देखील राहुल गांधी मागितली. मात्र श्रीकांत शिंदे सध्या भाषण करत असून त्यांचे भाषण झाल्यानंतर परवानगी दिली जाईल, असे अध्यक्षांनी सांगितले. मात्र, या उत्तराने काँग्रेस खासदारांचे समाधान झाले नाही. त्यानंतर काँग्रेस सर्व खासदारांनी सभागृहात गोंधळ घातल जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या भाषणादरम्यान सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती – राहुल गांधी काँग्रेसच्या गोंधळामुळे श्रीकांत शिंदे यांचे भाषण सुरु असताना अखेर सभापतींनी राहुल गांधी यांना बोलण्याची संधी दिली. यावेळी राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. यासंबंधी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘मी लहान असताना माझ्या आजी इंदिरा गांधी यांना सावरकर यांच्या विषयी विचारले होते. तेव्हा इंदिरा गांधी यांनी उत्तर दिले होते की, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गांधी, नेहरू आणि सावरकर देखील जेलमध्ये गेले होते. मात्र, सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती.’ श्रीकांत शिंदेंचा काँग्रेसवर पलटवार आजपर्यंतच्या इतिहासात काँग्रेसने कायमच संविधानाचा अपमान केला असल्याचा आरोप डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. इतकेच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करण्याचे कामही काँग्रेसने केले असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या काळातच देशात शिख बांधवांचे खून झाले असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. तसेच कार सेवकांवर गोळीबार करण्याचे काम काँग्रेसच्या काळात झाले, मुंबईमध्ये देखील बॉम्बस्फोट काँग्रेसच्या काळात झाले होते, असल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला. काँग्रेसचे नेते सावरकर यांचा अपमान करतात हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला मान्य आहे का? असा प्रश्न देखील श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला.

Share

-