अनाेळखी व्यक्तीची प्रशंसा करण्याचा ट्रेंड वाढताेय:याने अात्मविश्वासात हाेतेय वाढ, एकटेपणा घटतो

सध्या प्रशंसा करण्यासंदर्भातील व्यवसाय वाढत आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून केलेले सामान्य कौतुक ना केवळ एखाद्याचा दिवस चांगला करू शकते तर त्याच्या आत्मविश्वासात वाढ करू शकते. खूप सारे लोक या नवीन ट्रेंडला सकारात्मक रूपात पाहत आहेत. नुकतेच न्यूयाॅर्कमध्ये रेल्वे प्रवासादरम्यान एका महिलने दुसऱ्या महिलेच्या स्टायलिश ड्रेसचे कौतुक केले. यामुळे ती महिला फक्त आनंदीच झाली नाही तर तिने कौतुक करणाऱ्या महिलेची प्रशंसा केली. ही सामान्य परंतु मनापासून केलेले कौतुक एका नव्या सामाजिक सवयीकडे इशारा करते आणि ती सवय म्हणजे, एकमेकांचे कौतुक करणे होय. अनेक लोक अशा पद्धतीच्या कौतुकाला ना केवळ आनंदाचे कारण मानतात तर तो कुणाशी जोडण्याची चांगली पद्धती आहे. यामुळे एकटेपणा कमी होत आहे. ही घटना एक नाही. गेल्या काही दिवसांत, विशेषत: कोविडनंतर लोकांमध्ये संपर्क यंत्रणेच्या नव्या सवयीने जन्म घेतला. त्यात ते आपल्या अासपासच्या लोकांची स्टाइल, फॅशन, हेअरकट किंवा अन्य वैयक्तिक वैशिष्ट्याचे कौतुक करत असतात. मॅनहॅटनची पब्लिसिस्ट कॅटलिन फिलिप्सने सांगितले की, त्यांना नुकतेच आपल्या स्टाइलसाठी चार वेळा प्रशंसा मिळाली. याच पद्धतीने डान्सर क्रिस्टिन रोआने सांगितले की, नव्या हेअरकटनंतर तिची दोनदा प्रशंसा झाली. यामुळे तिला प्रेरणा मिळाल्याचे सांगते. दुसऱ्याला आनंदी करताना स्वत:ही आनंदी होऊ शकता मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या(एमआय) नाइट सायन्स जर्नालिझम प्रोग्रामच्या संचालक डॉ. डेबोरा ब्लम यांच्या म्हणण्यानुसार, एका सामान्य कौतुकाने एखादे मनोबल वाढू शकते. डॉ. ब्लम म्हणाल्या, माझी आजी नेहमी सल्ला देत होती की, एखाद्याला आनंदी केल्यास तुम्ही आपोआप आनंदी होऊ शकता. अनोळखींसोबत मैत्रीपूर्ण वर्तनाने त्यांना चांगले वाटते.

Share

-