दिव्य मराठी अपडेट्स:आजही थंडी कायम, मात्र उद्यापासून गारवा ओसरणार; पुन्हा ढगाळ वातावरण तसेच हलका पाऊस होण्याचा अंदाज
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स आजही थंडी कायम, मात्र उद्यापासून गारवा ओसरणार जालना – या आठवड्यात तापमानाचा पारा हंगामातील सर्वात कमी 9 अंशांवर खाली आल्याने गारवा अनुभवायला मिळाला. ही थंडी सोमवारीही कायम राहणार आहे.मात्र, मंगळवारपासून थंडी ओसरणार असून दिवसाला एका अंशाने कमाल तापमानातही वाढ होणार आहे. डिसेंबर महिन्यात तापमानात कमालीचा चढउतार पाहायला मिळाला, तर या आठवड्यात उत्तरेकडील थंडीची लाट आल्याने थंडीत कमालीची वाढ झाली.त्यामुळे तापमानाचा पारा कमालीचा घसरल्याचे पाहायला मिळाले. गेल्या चार दिवसांपासून12 ते 14 अंश सेल्सियसदरम्यान असणारे तापमान आता रविवारी 9 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. एकीकडे किमान तापमानात घटहोत असताना कमाल तापमानही23 अंशांपर्यंत खाली आले आहे. शनिवारी कमाल तापमान 23.5 अंश होते,तर रविवारी किमान तापमान 9अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळेजिल्ह्यात कमालीची थंडी अनुभवायला मिळाली. अशीचथंडी सोमवारीही कायम राहणारआहे. त्यानंतर मात्र पुन्हा ढगाळवातावरण तसेच हलका पाऊस होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे अाबालवृद्धांसह नागरिकांनाही विविध किरकोळ आजारांना सामोरे जावे लागणार आहे. आज तीर्थपुरीत बंद, परतूरयेथे काढला जाणार मोर्चा जालना – परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या पुतळ्यालगत राज्यघटनेची प्रतिकृती सुरक्षित ठेवण्यासाठी लावलेली काच फोडल्याच्या निषेधार्थ सोमवारीसकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घनसावंगीतालुक्यातील तीर्थपुरी येथे बंदची हाकदेण्यात आली अाहे. अशोक वानखेडे यांच्यानेतृत्वात हा बंद पुकारण्यात आला आहे. तरपरतूर शहरात सामाजिक कार्यकर्ते रोहनवाघमारे यांच्या नेतृत्वात सकाळी 10 वाजता परतूर शहरातील संविधान चौक तेउपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंतमोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मी … ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…मी अडीच वर्षेच मंत्री राहणार; शिंदेंनी शपथपत्रावर मंत्र्यांच्या घेतल्या स्वाक्षऱ्या नागपूर – शपथविधी होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संभाव्य मंत्र्यांकडून शपथपत्र लिहून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही जुने चेहरे आहेत, तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्रिपदाचा एक फॉर्म्युला सांगितला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षेच मंत्रिपद देण्यात येणार आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांकडून शपथपत्र लिहून घेतल्याची माहिती आहे. शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांना आधीच पूर्वकल्पना देऊन ठेवल्याचेही सांगण्यात आले आहे. असे झाले तर शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे उद्यापासून होणार अन्नत्याग आंदोलन सोलापूर – एसटी कर्मचाऱ्यांना 2020 पासून न दिलेले थकीत देय तातडीने द्यावे यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे उद्यापासून (17 डिसेंबर) अन्नत्याग अांदोलन होणार आहे. लवकर या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. एसटी कर्मचान्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करण्यात यावे, त्यांचे 2020 पासूनचे थकीत देणे तातडीने देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 1 देश-1 निवडणूक विधेयक आज संसदेच्या पटलावर नाही नवी दिल्ली – एक देश-एक निवडणुकीशी संबंधित दोन विधेयकांना नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती. यानंतर असे सांगण्यात आले की, विधेयक सोमवारी संसदेत सादर केले जाईल. शुक्रवारी जारी संसदेच्या कार्यसूचीत विधेयक सोमवारी लोकसभेत मांडण्यात येणार, अशी माहिती देण्यात आली. सरकारकडूनही याची तयारी सुरू होती. तथापि, सुधारित कार्यसूची आली तेव्हा यात विधेयकाचा उल्लेख नाही. सध्या यावर कोणतेच अधिकृत वक्तव्य आलेले नाही. विधेयक न आणण्याचा निर्णय का घेण्यात आला व आता हे विधेयक कधी आणले जाईल हेदेखील स्पष्ट नाही. तथापि, केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवे आयकर विधेयक आणणार नाही. ही शक्यता अर्थ मंत्रालयाने फेटाळली. संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल सोमवारपासून राज्यसभेत दोन दिवसांची चर्चा सुरू होईल. याची सुरुवात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करतील. जे. पी. नड्डा आणि भूपेंद्र यादव हेदेखील यावर बोलणार आहेत. जिल्हा वरिष्ठ ज्युदाे संघ निवड चाचणी बुधवारी छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्युदाे संघटनेच्या वतीने जिल्हा वरिष्ठ संघ निवड चाचणीचे 18 डिसेंबर राेजी सायंकाळी 4 वाजता संघटनेच्या एन 3 सिडकाे हाॅलवर अायाेजन केले अाहे. निवडलेला संघ नाशिक येथे 20 ते 21 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी हाेईल, असे संघटनेचे सचिव अतुल बामणोदकर यांनी सांगितले.