हसीना सरकार पडल्यानंतर पहिल्या विजयदिनी भारतविरोधी घोषणा!:भारतीय सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या युद्धस्मारकाचे काम बंद

१६ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेशातील ९ महिने चाललेला मुक्तिसंग्राम संपला होता. भारतासोबतच्या १३ दिवसांच्या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला आणि पूर्व पाकिस्तानच्या जागी बांगलादेशची निर्मिती झाली. त्याची आठवण म्हणून बांगलादेश आणि भारत विजय दिन साजरा करतात. शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर सोमवारी बांगलादेशात प्रथमच विजय दिवस साजरा करण्यात आला. यानंतर येथील सत्तेत प्रा. मोहंमद युनूस यांचे अंतरिम सरकार आहे, त्यामुळे या वेळचा उत्सव वेगळा आहे.बांगलादेशने सोमवारी ५३ वा विजय दिन साजरा केला, तेव्हा ढाक्याच्या रस्त्यावर आनंदापेक्षा भारताचा विरोध अधिक होता. बांगलादेशात भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधले जाणारे आशुपूरचे युद्धस्मारक विजय दिनाच्या दिवशी सोमवारी निर्जन राहिले. ढाक्याच्या रस्त्यावर भारत आणि पंतप्रधान मोदींविरोधात उघडपणे घोषणाबाजी करण्यात आली. बीएनपीने माणिक मियाँ एव्हेन्यू येथे “शोबर आगे बांगलादेश” मेगा म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन केले होते. त्यात बांगलादेशच्या बड्या स्टार्सनी परफॉर्म केले. यात बेबी नाजनीनने पुनरागमन केले. आशा भोसले व बप्पी लाहिरी यांच्यासोबत तिने गाणी गायली आहेत. बीएनपीशी संबंधित नाजनीन हसीना सरकारच्या काळात तुरुंगात होत्या. सुहरावर्दी पार्क : येथे पाक लष्कर शरण आले होते, तेथे या वर्षी कोणती परेड नाही या वेळी विजय दिनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ढाक्याच्या सुहरावर्दी पार्कमध्ये लष्कराची परेड झाली नाही. १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानच्या ईस्टर्न कमांडचे नेतृत्व करणारे जनरल नियाझी यांनी सैनिकांसह सुहरावर्दी पार्कच्या मैदानात भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. पूर्वी या मैदानाचे नाव रमणा रेसकोर्स गार्डन असे होते. नंतर त्याची ओळख बंगालचे माजी पंतप्रधान हुसेन शहीद सुहरावर्दी यांच्या नावाने झाली.
अंतरिम सरकारनेही परेड न घेण्याचे कारण दिले आहे. कारण- मुक्तिसंग्रामविषयक सल्लागार फारुख-ए-आझम म्हणाले की, सध्या देशभरात लष्कर तैनात आहे. हे बदलले नाही : भारतातून अधिकारी बांगलादेशात, मुक्तीवाहिनीचे योद्धे भारतात बांगलादेशी अधिकारी व ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले की, दोन्ही देशांचे प्रत्येकी दोन अधिकारी ढाका व कोलकात्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहतील. रविवारी दोन्ही देशांचे अधिकारी ढाका व कोलकाता येथे पोहोचले. या वेळी केवळ ९ जणांचे शिष्टमंडळ ढाकाहून भारतात आले. कोलकात्यातील विजय दिनाच्या सोहळ्यात या सर्वांनी सहभाग घेतला.. पूर्वी ही संख्या ७० पर्यंत असायची. २०२३ मध्ये ३० लोकांचे शिष्टमंडळ भारतात आले होते. ढाका विद्यापीठ : दहशतवादविरोधी राजू स्तंभ, येथूनच ‘दिल्ली ना ढाका’च्या घोषणा भास्कर सोमवारी ढाका विद्यापीठातील दहशतवादविरोधी राजू स्मारक स्तंभावर पोहोचला. येथे प्रत्येकाच्या हातात बांगलादेशचा ध्वज होता. त्यांच्यापैकी असजदुजमान सिकदर घोषणा देत होते – ‘दिल्ली ना ढाका, बाकीचे लोक ‘ढाका, ढाका’ घोषणा देत होते. सिकदार सांगतात की, आतापर्यंत विजय दिन हा राजकीय पद्धतीने साजरा केला जात होता. आज प्रथमच असे दिसते की हा कोणत्याही पक्षाचा नसून बांगलादेशातील जनतेचा विजय आहे.

Share

-