नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस:अजित पवार विधिमंडळ कामकाजात सहभागी होण्याची शक्यता
राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती खराब असल्याने ते आजपर्यंत अधिवेशनात दिसले नाहीत. तर ते आज सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच नागपूर मध्ये असलेल्या प्रचंड थंडीमुळे अनेक नेत्यांची प्रकृती खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची देखील प्रकृती खराब असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.