मंत्रालयाबाहेर कॉंग्रेसचे जोरदार आंदोलन:आक्रमक कार्यकर्त्यांनी केली ‘जय भीम’ची घोषणाबाजी, पोलिसांची धरपकड

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ कॉंग्रेस आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे. अशातच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबई येथील कॉंग्रेस कार्यालयावर हल्ला केला होता. याच्या निषेधार्थ आज पुन्हा एकदा कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत मुंबई येथील मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन केले. तसेच कॉंग्रेस कार्यालयावर करण्यात आलेला हल्ला हा अमित शहा यांच्या सांगण्यावरून करण्यात आला असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत ‘जय भीम’च्या घोषणा देत मंत्रालय परिसरात जोरदार आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड देखील केल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतल्याचे समजते. अमित शहा यांनी केलेल्या विधानावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असल्याचे देशभरात पाहायला मिळत आहे. दरम्यान, लयात घुसून दगडफेक करत हल्ला केला. खिडक्यांसह फर्निचरची तोडफोड केली. काँग्रेस नेत्यांच्या फलकांवर काळे फेकले. घटनेची माहिती मिळताच शेजारच्या आझाद मैदान ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोर कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. या घटनांमुळे देशासह महाराष्ट्रातली देखील राजकीय परिस्थिती चिघळली असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. कॉंग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप गुंडगिरीवर उतरलाय. या भ्याड हल्ल्याच्या मी निषेध करते. आम्ही काँग्रेसचे बब्बरशेर कार्यकर्ते आहोत. आम्ही लढू, भिडू आणि जिंकू.आम्ही याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत.

Share

-