आठवडाभराच्या झोपेची भरपाई रात्रीत शक्य नाही- जाणकार:झोप कमी अन् जास्तही नको; अपुऱ्या झोपेमुळे स्मरणशक्तीत घट, अधिक झोपही अपायकारक

चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोपही आवश्यक आहे. पुरेशा झोपेअभावी स्मृतिभ्रंश, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढतो. जगभरात मोठ्या संख्येत लोक या समस्येने त्रस्त आहेत. चांगल्या झोपेसाठी ते नानाविध उपाय करत आहेत. अनेक पद्धती अवलंबत आहेत. त्यातील अनेक उपाय शोधावर आधारित नाहीत. ते अपुऱ्या झोपेच्या समस्यांचे निराकरण करू शकत नाहीत. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील स्लीप मेडिसिन एक्स्पर्ट रेबेका रॉबिन्स सांगतात की, झोपेशी निगडित मिथकांना दूर करण्याची गरज आहे. अन्यथा ही समस्या अशीच कायम राहील. जाणकारांकडून जाणून घेऊ… कॅफिनसारख्या उपायांनी झोपेची वेळ कमी करण्याचा प्रयत्न करू नका, समस्या वाढेल 1. कमी झोपेची सवय : दीर्घकाळ कमी झोप घेतल्याने आपल्या वाटते की आता शरीराला याची सवय झाली.
वास्तव : नॉर्थवेस्टर्न मेडिसिन लेक फॉरेस्ट हॉस्पिटलचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ. इयान कॅटजल्सन सांगतात की, कमी झोपेसाठी तुम्ही कॅफिनसारख्या उपायांचा अवलंब करता. मात्र नकारात्मक प्रभावातून वाचू शकत नाही. वाईट स्मरणशक्ती, मूड बदलणे, रचनात्मकतेत घट याचे मोठे कारण म्हणजे कमी झोप.
२.जास्त झोप चांगली : जास्त वेळ झोपल्याने शरीराला आराम मिळतो. समस्या निर्माण होत नाहीत…
वास्तव : अमेरिकन स्लीप मेडिसिन अकॅडमीच्या एक्स्पर्ट डॉ. फरीहा अब्बासी सांगतात की, वयस्कांसाठी ७-९ तासांची झोप पुरेशी आहे. नऊ तासांहून अधिक काळ झोपल्यास श्वसनाच्या आजाराने मृत्यूचा धोका ३५% वाढतो. सर्वसाधारण झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत मधुमेहाचा धोकाही अधिक असतो.
३. वीकेंडमध्ये भरपूर झोपणे: वीकेंडला उशिरापर्यंत झोपण्याने त्याची भरपाई होईल….
वास्तव : स्लीप एक्स्पर्ट डॉ. थॉमस किलकेनी सांगतात की, वीकेंडमध्ये कधीतरी दीर्घकाळ झोपणे ठीक आहे. मात्र वारंवार असे होत असेल तर आठवड्यात तुम्ही पुरेशी झोप घेत नाही. आठवडाभराच्या झोपेची भरपाई एका रात्रीत शक्य नाही. त्याऐवजी रोज पंधरा मिनिटे लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. खूप जास्त बदल नको.
४. झोप मोडणे अयोग्य : रात्री अचानक जाग, वाईट झोपेचे संकेत.
वास्तव : स्लीप रिसर्चर डॉ. जेनिफर गोल्डश्मिड सांगतात की, ‘शरीर रात्रभर झोपेच्या विविध टप्प्यातून जाते. त्यातील बदलामुळे झोप मोडू शकते. पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करा. पुस्तके वाचा, ध्यान करा… जागे राहू नका.
५. सुस्ती-घोरणे सामान्य : झोपेशी संबंधित आजाराच्या एक्स्पर्ट डॉ. एन रोमेकर सांगतात की, ‘नेहमीचीच सुस्ती चांगली नव्हे. त्यामुळे बौद्धिक कामगिरी सुमार होते. सकाळच्या उन्हात फिरण्याचा चांगला फायदा होतो.

Share

-