कॅनडात ट्रुडाेंची जागा घेण्याच्या स्पर्धेत 3 महिला:भारतवंशी रुबींचा समावेश, 157 वर्षांत कोणतीही महिला लिबरल पार्टीच्या प्रमुख नाहीत
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची लिबरल पार्टी ९ मार्च रोजी पक्षप्रमुखाची निवड करेल. या स्पर्धेत ३ महिलांसह ५ नेते आहेत. यात भारतीय वंशाच्या रुबी ढल्ला यांचा समावेश आहे. मात्र, पक्षप्रमुखाच्या स्पर्धेत माजी डेप्युटी पीएम क्रिस्टिया फ्रीलँड आणि इन्व्हेस्टमेंट बँकर मार्क कार्नी यांचे नाव आघाडीवर आहे. यासोबत लिबरल पार्टीच्या सभागृह नेत्या करिना गुल्ड व बिझनेसमन फ्रँक बेलीसही स्पर्धेत आहेत. ट्रुडो १२ वर्षांपासून पक्षाचे प्रमुख आहेत आणि ९ वर्षांपासून पंतप्रधान आहेत. गेल्या २ वर्षांपासून आर्थिक, बेरोजगारी, विदेश धोरण व फुटीरतावाद्यांवरील नियंत्रणात निष्फळ आहेत. ७२% कॅनडियन म्हणाले, खलिस्तानी फुटीरतावाद्यांना लगाम घालावा कॅनडात खलिस्तानी फुटीरतावाद्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. ५४% कॅनडियन येथे खलिस्तानी फुटीरतावादी आंदोलनाच्या संचालनास विरोध करतात. ७२ टक्क्यांनुसार, खलिस्तानसारख्या विदेशी फुटीरतावाद्यांवर लगाम घातला पाहिजे. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. लीगर ३६० संस्थेच्या पाहणीत ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार, ३०% कॅनडियन मानतात की, खलिस्तानींच्या फुटीरतावादी कारवायांमुळे शीख समाजाला अयोग्य चौकशीचा सामना करावा लागत आहे. रुबी यांनी चित्रपटात काम केले, महिलांशी संबंधित मुद्दे उचलतात… राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी ढल्ला यांनी हिंदी चित्रपटांतही काम केले होते. ढल्ला यांनी २००३ मध्ये ‘क्यों, किस लिए’नामक चित्रपटात अभिनय केला होता. १९९३ मध्ये त्या मिस इंडिया कॅनडा स्पर्धेत उपविजेत्या राहिल्या. २००४ पासून २०११ पर्यंत खासदार राहिल्या. भारतीय वंशाच्या रुबी ढल्ला लिबरल पार्टीच्या प्रमुख झाल्यास १५७ वर्षांच्या इतिहासात एक महिला पक्षप्रमुख होईल. कार्नी आर्थिक संकटमोचक म्हणवून घेतात.. मार्क कार्नी कॅनडाचे माजी केंद्रीय बँक प्रमुख राहिले आहेत. ते स्वत:ला आर्थिक संकटमोचक म्हणवून घेत दावेदारी प्रबळ करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकतात. क्रिस्टियांना ट्रम्प यांनी टॉक्सिक म्हटले… क्रिस्टिया यांनी ट्रुडोंसोबतच्या मतभेदामुळे राजीनामा दिला होता. त्यांची दावेदारी बळकट मानली जाते. मात्र, टीकाकार त्यांना अव्यावहारिक म्हणतात. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्पनी त्यांना टॉक्सिक संबोधले.