मुंबई विमानतळावर कारच्या धडकेत 5 जण जखमी:यात 2 परदेशी प्रवाशांचा समावेश; पोलिसांचा दावा- ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला, चालकाला अटक
![](https://natepute.com/wp-content/uploads/2025/02/gixkrdlxgaabjoe_1738494539-gcuGP2.png)
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी मर्सिडीज कारने धडक दिल्याने दोन परदेशी नागरिकांसह पाच जण जखमी झाले. टर्मिनल 2 च्या पार्किंगमध्ये हा अपघात झाला. बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. जखमींमध्ये दोन परदेशी नागरिकांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानतळावरील तीन क्रू मेंबर्सही जखमी झाले असून त्यांच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कार चालवत असलेल्या परशुराम चिंचोलाप्पा दादनवरे यांनी ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याचा दावा पोलिसांनी केला आहे, त्यामुळे हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले – चालक मद्यधुंद नव्हता अपघातानंतर पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी चालकाने दारू किंवा अंमली पदार्थांचे सेवन केलेले नव्हते. चालक प्रवाशाला सोडण्यासाठी विमानतळावर आला होता. त्याने चुकून ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला, त्यामुळे गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे टर्मिनल 2 च्या पार्किंगमध्ये हा अपघात झाला. यानंतर कार गेटसमोरील रॅम्पवर आदळली. जानेवारीत कार अपघात 14 जानेवारी : नवी मुंबईत कारने पुरुष आणि महिलेला धडक दिली. मुंबई, महाराष्ट्रात पुन्हा एकदा वेगवान गाड्यांचा कहर पाहायला मिळाला. नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी परिसरात 14 जानेवारीला सकाळी 9.46 वाजता एका पुरुष आणि महिलेला कारने धडक दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. 12 जानेवारी : नाशिकमध्ये 6 जणांचा मृत्यू नाशिकमध्ये 12 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लोखंडी रॉडने भरलेल्या आयशर वाहनाला पिकअप वाहनाची धडक बसली. या घटनेत पिकअपमध्ये प्रवास करणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले. नाशिक-मुंबई महामार्गावर हा अपघात झाला. अपघात झालेल्या पिकअप गाडीत 16 जण होते. निफाड येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन हे सर्वजण सिडकोत परतत होते.