स्वारगेट प्रकरणातील आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत फोटो:नेत्याचा फोटोही DP ला; आमदार कटकेंना पुढे येऊन करावा लागला खुलासा

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपीचे राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा रंगली आहे. दत्तात्रय गाडे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. दत्तात्रय गाडेने शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो सोशल मीडियाच्या डीपीला ठेवला आहे. तर शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऱ्या बॅनवरही दत्तात्रय गावडेचा फोटो असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे पुणे शहरासह राज्यात खळबळ माजली आहे. दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहे. यादरम्यान दत्तात्रय गाडे यांचे आमदार आणि माजी आमदाराच्या एका फ्लेक्सवरही त्याचा फोटो असून आमदार माऊली कटके यांचा फोटो त्याने व्हॉट्सअॅप डीपीला ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दत्ता गाडे हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. आमदार माऊली कटके यांनी या फोटोबाबत खुलासा केला आहे. आपला दत्तात्रय गाडेशी आपला कोणताही संबंध नसून आपण त्याला ओळखत नसल्याचे माऊली कटके म्हणालेत. मी मतदारसंघांतील 10 हजार पेक्षा जास्त लोकांना देवदर्शन करून आणले आहे. अनेक कार्यकर्ते मतदारसंघात फिरत असताना फोटो काढत असतात. माझा संबंधित व्यक्तीसोबत फोटो असला तरी त्याचा आणि माझा कसलाही संबंध नाही. कारण अनेक कार्यकर्ते मतदारसंघात सोबत फोटो काढत असतात, असे माऊल कटके यांनी स्पष्ट केले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि केस फास्टटॅ्क कोर्टात हा खटला चालवावा, अशी माझी मागणी असल्याचेही ते म्हणाले. राजकीय फ्लेक्सवर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच फोटो असल्याचे चित्र आहे, तर दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअॅप डीपीला शिरुरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी फरार घोषित केले आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी आता नागरिकांची मदत मागितली आहे. फरार आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दत्तात्रय गाडेबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. तसेच आरोपीबद्दल माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.