स्वारगेट प्रकरणातील आरोपीची खैर नाही:नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. लाडक्या बहिणीवर अत्याचार करण्याची गय केली जाणार नाही. आरोपी हा कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पुण्याच्या स्वारगेट बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे 5.30 च्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ माजली होती. अत्याचार करून फरार झालेला आरोपी स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाला. दत्तात्रय रामदास गाडे असे त्याचे नाव असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 13 पथके रवाना झाली असून तपास केला जात आहे. काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आमच्या लाडक्यासोबत निंदनीय प्रकार घडलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून आहे. मी स्वत: पुणे पोलिसा आयुक्तांशी चर्चा केली आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याच्या सूचना आम्ही सरकारच्या वतीने दिलेल्या आहेत. आरोपीचे सर्व लागेबांधे पोलिसांच्या हाती आलेले आहेत. त्याला कुठल्याही परिस्थिती तत्काळ अटक केली होईल. कुठल्याही पक्षाचा असला, तरी कारवाई करणार
अशाप्रकारचे नराधम आमच्या लाडक्या बहिणींवर अत्याचार करत असतील, तर त्यांची गय केली जाणार नाही, सोडले जाणार नाही. अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याचे सरकारचे धोरण आणि भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आरोपी हा कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्याचा कोणाशीही संबंध असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. हा गुन्हेगार आहे. लाडक्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. बंद पडलेल्या बस निकाली काढण्याच्या सूचना
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. ज्या बस आगारात बंद पडलेल्या बसमध्ये होणारे गैरप्रकार पूर्णपणे बंद झाले पाहिजेत. अशा प्रकारच्या बंद पडलेल्या गाड्या तत्काळ निकाली काढाव्यात. कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगारीला वाव मिळता कामा नये, अशा सूचना सर्व आगार प्रमुखांना दिल्या आहेत. परिवहन मंत्र्यांनी काल सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. एसटी महामंडळ प्रशासन आणि सरकारच्या वतीने कठोर कारवाई केली जाईल. लाडक्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. हे ही वाचा… स्वारगेट डेपोतील ‘ती’ शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली:खबरदारी म्हणून कारवाई; पोलिसांना बसमध्ये दत्तात्रय गाडेचा बूट आढळला स्वारगेट प्रकरणातील आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत फोटो:नेत्याचा फोटोही DP ला; आमदार कटकेंना पुढे येऊन करावा लागला खुलासा स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास वेगवान:आरोपीचे संभाव्य लोकेशन मिळाले, लवकरच अटक होणार – गृहराज्यमंत्री कदम स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार घोषित:दत्तात्रय गाडेबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाखाचे बक्षीस, पुणे पोलिसांची घोषणा

Share

-