सुपरबिलियनेयर:24 सर्वात श्रीमंत लोकांची श्रेणी; यात अंबानी, अदानी, एलन मस्क प्रथम क्रमांकावर

जगात अब्जाधीशांची संख्या वाढण्यासोबत ‘सुपरबिलियनेयर’ची नवी श्रेणी समोर आली आहे. यात अशा अब्जाधीशांचा समावेश केला आहे, ज्यांची एकूण संपत्ती ४.३५ लाख कोटी रु.(५० अब्ज डॉलर) किंवा त्यापेक्षा जास्त आहे. यात भारतात अब्जाधीश मुकेश अंबानी, गौतम अदानींसह जेफ बेजोस, मार्क झुकेरबर्ग, वॉरेन बफे यांच्यासारख्या लोकांचा समावेश आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, या यादीत २४ सुपरबिलियनेयरचा समावेश आहे. त्यातील १६ सेंटी बिलियनेयर आहेत. त्यांची संपत्ती ८.७१ लाख कोटी रु.(१०० अब्ज डॉलर) वा त्यापेक्षा जास्त आहे. यात टेस्ला, स्पेसएक्स व न्यूरालिंकसारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क टॉपवर आहेत. म्हणजे ते सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती एका सरासरी अमेरिकी कुटुंबाच्या संपत्तीपेक्षा २० लाख पट जास्त आहे. लक्झरी बाजारात बहार वृत्तानुसार, सुपरबिलियनेयरच्या वाढत्या संख्येने लक्झरी बाजाराला प्रोत्साहन दिले. या लोकांकडे जगभरातील कोट्यवधी डॉलरच्या महागड्या मालमत्ता आहेत. न्यूयॉर्क, मियामी, लॉस एंजलिस यासारख्या शहरांत त्यांच्यासाठी विशेष रूपात बांधलेल्या लक्झरी अपार्टमेंट आणि घरांच्या विक्रीत तेजी आली आहे. श्रीमंत आणि गरिबातील दरी वाढली तज्ज्ञांनुसार, हा ट्रेंड दर्शवतो की, श्रीमंत आणि गरिबातील दरी वाढली आहे. अमेरिकेत, सर्वात श्रीमंत १% लोक देशाच्या एकूण संपत्तीच्या ३०% वाटा बाळगतात. हा १९८० च्या दशकाच्या तुलनेत खूप जास्त आहे. आधीच्या तुलनेत सध्याच्या अब्जाधीशांची संपत्ती काही वर्षांत अनेक पट वाढली आहे. उदाहरणार्थ मस्क आणि बेजोस यांच्या संपत्तीत गेल्या काही वर्षांत अब्जावधी डॉलर्सचा चढ-उतार पाहायला मिळाला. मुकेश अंबानींची संपत्ती ७.९० लाख कोटी रु. सुपरबिलियनेयर यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ७.९० लाख कोटी रु. आहे. दुसरे भारतीय अब्जाधीश गौतम अदानींची मालमत्ता ६.५२ लाख कोटी रु. आहे.