हसीना यांना पदच्युत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पक्षाची स्थापना आज:लष्कराचाही पाठिंबा, 7 महिन्यांनी सत्तेच्या स्पर्धेत उतरले आंदोलक विद्यार्थी

ऑगस्ट २०२४ मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध आंदोलन चालवत त्यांना पदच्युत करणारे विद्यार्थी आता नवीन राजकीय पक्ष स्थापन करत आहेत. हसीना यांनी देश सोडून ७ महिने झाल्यानंतर या पक्षाची घोषणा शुक्रवारी होणार आहे. वृत्तानुसार, विद्यार्थ्यांच्या पक्षाचे नाव जातीय नागरिक पार्टी(नॅशनल सिटिझन पार्टी) असू शकते. विद्यार्थी आंदोलनाचे प्रमुख नेते नाहिद इस्लामने नव्या पक्षाचे नेतृत्व करता यावे यासाठी मोहंमद युनूस यांच्या काळजीवाहू सरकारमधून राजीनामा दिला आहे. अद्याप सर्व पदांवर सहमती झाली नाही. या पक्षात पाकिस्तान समर्थक व कट्टरपंथी जमात इस्लामची विद्यार्थी शाखा ‘छात्र शिविर’शी संबंधित अनेक माजी नेते व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यामुळे पक्ष स्थापनेबाबत आधीपासूनच टीका होत आहे. सूत्रांनुसार, शिविरचे माजी नेते महत्त्वाच्या पदे प्राप्त करण्यासाठी दबाव टाकत आहेत. जातीय नागरिक समिती आणि भेदभावविरोधी विद्यार्थी आंदोलनाच्या नेत्यांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले की, पक्षाच्या निशाण्यासाठी मुठ धरलेला हात, हत्ती आणि वाघ प्रतिकाच्या रूपात प्रस्तावित केले आहेत. जातीय नागरिक समितीच्या प्रवक्त्या सामंता शेरमीन म्हणाल्या, शुक्रवारी पक्ष भव्य रॅलीसोबत आपला प्रवास सुरू करेल. महत्त्वाची पदे हस्तगत करण्यासाठी दबाव बनवताहेत विद्यार्थी नेते खालिदा झिया यांचे पुत्र तारिक म्हणाले, निवडणूक कटापासून सतर्क राहा : પૂमाजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र व बीएनपीचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान म्हणाले, की बांगलादेशात एकात्मकता व निवडणूक वातावरण नष्ट करण्याच्या कटाप्रति सतर्क राहा. काही लोक बांगलादेशला अधिनस्थ राज्य बनवू इच्छितात. वृत्तानुसार, जातीय नागरिक समिती आणि भेदभावविरोधी विद्यार्थी आंदोलन नाहिद इस्लाम याचे संयोजक राहतील. त्यांनी संयोजकाची जबाबदारी बजावण्यासाठी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. पक्षाचे सदस्य सचिव अख्तर हुसेन, मुख्य आयोजक(उत्तर) सरजिस आलम, मुख्य आयोजक(दक्षिण) हसनत अब्दुल्ला, मुख्य समन्वयक नसीरुद्दीन पटवारी आणि संयुक्त समन्वयक हन्नान मसूद असतील.☺ अख्तर हुसेन- जातीय नागरिक समितीचे सदस्य सचिव आहेत. सरजिस आलम- हसीनांच्या पक्षाची विद्यार्थी संघटना छात्र लीगचे विद्यार्थी नेते होते. मात्र, विद्यार्थी आंदोलनाचे नेते आहेत. हसनत अब्दुल्ला- स्टूडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशनचे संयोजक आहेत. नसीरुद्दीन पटवारी- ते ढाका विद्यापीठात शिविर नेते होते. नंतर ते जमात इस्लामचे माजी नेत्यांद्वारे स्थापन एबी पार्टीत सहभागी झाले. तेथून ते जातीय नागरिक समितीत आले. अब्दुल हन्नान मसूद- पूर्वाश्रमीचे शिविर नेते, जुलैमधील चळवळीत समन्वयकांपैकी एक आहेत. मार्चमध्ये बांगलादेश दौऱ्यावर येऊ शकतात संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बांगलादेशात सुरू असलेल्या राजकीय व सुरक्षेच्या तणावात संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटिनियो गुटेरेस मार्चच्या मध्यात बांगलोदशचा दौरा करू शकतात. दुसरीकडे, मंगळवारी बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वाकर-उज-जमान यांनी इशारा दिला की, आरोप-प्रत्यारोप बंद न केल्यास देशातील सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते. बांगलादेश संसदेत ३०० जागा, १०० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट जातीय नागरिक समितीच्या एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ते संसदीय निवडणुकीत १०० जागा जिंकण्यास पुढील निवडणुकीत सत्तेत येण्याच्या उद्दिष्टासह पक्ष स्थापन करत आहेत. या वेळी चांगल्या जागा मिळाल्यास ते आघाडी सरकारचा भाग बनू शकतात. बांगलादेश संसदेत ३५० जागा आहेत, त्यापैकी ३०० खासदार निवडले जातात. ७ जाने.

Share

-