काही दिवसांचाच पाहुणा, घरात घुसून खात्मा करणार:इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना पुन्हा धमकी; प्रशांत कोरटकर अद्यापही फरार

इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना काहीह दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर यांनी धमकी दिली असल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा इंद्रजीत सावंत यांना नव्याने धमकी देण्यात आली आहे. थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू, अशा धमकीचा संदेश इंद्रजीत सावंत यांना आला आहे. इंद्रजीत सावंत यांना नव्याने धमकी देण्यात आली असून केशव वैद्य असे या धमकी देणाऱ्याचे नाव आहे. थडओय दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू, अशी धमकी केशव वैद्य या व्यक्तीने यूट्यूब चॅनलच्या कमेंटमधून दिली आहे. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर इंद्रजीत सावंत यांनी वकिलांची भेट घेतली असून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय इंद्रजीत सावंत निर्णय घेतील असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांनी चार दिवसांपूर्वी इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणानंतर प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस याचा शोध घेत असल्याचे समजते. पोलिसांनी प्रशांत कोरटकरच्या नागपूर येथील घरी जाऊन देखील तपास केला, मात्र अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागला नाही. मोबाइल स्विचऑफ असल्याने ठिकाणची माहिती मिळत नाही पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोबाइल स्विचऑफ असल्याने तो लपलेल्या ठिकाणाची माहिती मिळालेली नाही. त्याच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला आहे. समन्वयातून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी सकाळी कोरटकर याच्या घरासमोर काही तरुणांनी घोषणाबाजी केली. कायदासुव्यवस्था राखण्यासाठी त्याच्या घरासमोर बंदोबस्तात तैनात केल्याचे नागपूर पोलिसांनी सांगितले. कोल्हापूर येथील पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वात पथकात पाच पोलिसांचा समावेश करण्यात आला आहे.

Share

-