संतोष देशमुख हत्या प्रकरणातून दोघांना वगळले:एक हत्या, तर दुसरा ॲट्रोसिटीच्या प्रकरणात होता आरोपी; पुरावे न सापडल्याने आरोपपत्रात नाव नाही

मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडीने आरोपपत्र दाखल केले असून या प्रकरणात धनंजच मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचा दावा केला आहे. 1500 हून अधिक पानांच्या या आरोपपत्रात संतोष देशमुख हत्याकांडची सविस्तर माहिती देण्यात आलेल आहे. परंतु, सीआयडीने या प्रकरणातून दोघांना वगळण्यात आले आहे. सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळे या दोघांची नावे आरोपपत्रात टाकण्यात आलेली नाही. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीने 1500 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात वाल्मीक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून ही माहिती समोर आली असून, संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा, असा मेसेज वाल्मीक कराडने विष्णू चाटेमार्फत सुदर्शन घुलेला दिला होता, हे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे वाल्मीक कराडचा पाय पुरता खोलात गेल्याचे मानले जात आहे. मात्र, या आरोपपत्रातून सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळे यांची नावे वगळण्यात आली आहेत. पुरावे नसल्याने दोघांना या प्रकरणातून वगळले सीआयडीने संतोष देशमुख हत्या, दोन कोटीचे खंडणी प्रकरण आणि ॲट्रोसिटी अशा तीन प्रकरणाचा एकत्रित तपास करून हे आरोपपत्र दाखल केले आहे. सिद्धार्थ सोनावणे हा हत्येच्या आरोपातील आरोपी होता. तर रणजित मुळे हा ॲट्रोसिटीच्या प्रकरणात आरोपी होता. या दोघांनाही या प्रकरणातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्यामुळे आरोपपत्रात त्याचे नाव टाकण्यात आलेले नसल्याची माहिती आहे. गुन्ह्यात हे आरोपी अटकेत वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, प्रतिक घुले, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे व जयराम चाटे हे आरोपी अटक आहेत. त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल आहे. तर, कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. तीन गुन्ह्यांची लिंक अशी 29 नोव्हेंबर 2024 रोजी वाल्मीकने आवादा कंपनीला 2 कोटींची खंडणी विष्णू चाटेच्या मोबाईल वरुन मागितली होती. त्याच्या वसूलीची जबाबदारी चाटेसह सुदर्शन घुले व सहकाऱ्यांकडे दिली होती. यातूनच 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले हा सहकाऱ्यांसह मस्साजोगला कंपनीच्या कार्यालयात गेला. तिथे सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. सुरक्षा रक्षकाने बोलावल्याने सरपंच संतोष देशमुख तिथे गेले. त्यांच्यात व घुलेमध्ये वाद झाला. या प्रकरणात घुले विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या रागातून घुले याने 9 डिसेंबरला अपहरण करुन देशमुख यांची हत्या केली. अशी मांडणी सीआयडीने केली आहे. हे ही वाचा… वाल्मीक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार:आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख; मारहाणीचा पुरावा असणारा VIDEO ही CID च्या हाती वाल्मीक कराड हाच बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा बीड पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात केला आहे. या आरोपपत्रात वाल्मीकचा उल्लेख आरोपी क्रमांक 1 असा करण्यात आला आहे. यामुळे या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराड भोवतीचा कारवाईचा फास आणखीनच आवळला गेला आहे. पूर्ण बातमी वाचा… धनंजय मुंडे व नैतिकतेची कधी भेटच झाली नाही:या लोकांना एवढे अमानुष वागण्याचा अधिकारच कुणी दिला? सुप्रिया सुळे यांचा घणाघात ​​​​​​​ बीड पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवत त्यांची व नैतिकतेची केव्हा भेटच झाली नसल्याचा दावा केला. सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या व्यक्तीला (वाल्मीक कराड) एवढे अमानुष वागण्याचा अधिकारच कुणी दिला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पूर्ण बातमी वाचा…

Share

-