माझे शासन, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद सोडविण्यासाठी वचनबद्ध:राज्यपालांच्या अभिभाषणात थेट उल्लेख; वाचा ठळक मुद्दे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार वचनबद्ध असल्याचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या अभिभाषणात राज्यपालांनी या प्रश्नाचा थेट उल्लेख केला आहे. तसेच हा विवाद सोडविण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती केली आहे. माझे शासन, सीमावर्ती भागामध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेसाठी शैक्षणिक, वैद्यकीय व इतर विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणातील प्रमुख मुद्दे देखील पहा…. सभापती महोदय, अध्यक्ष महाराज आणि सन्माननीय सदस्य हो, सन्माननीय सदस्यहो, या अधिवेशनामध्ये, नवीन वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय प्रस्ताव, विनियोजन विधेयके व इतर विधिविधाने आपल्या विचारार्थ मांडण्यात येतील. महाराष्ट्राला अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठी, सन्माननीय सदस्य, कामकाजात सहभाग घेतील व या प्रस्तावांवर आपली अभ्यासपूर्ण मते मांडतील, असा मला विश्वास आहे.

Share

-