संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो:हैवानाचाही थरकाप उडवणारा प्रकार, महाराष्ट्राला हादरवणारा घटनाक्रम

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह व्हिडिओ व फोटो समोर आले आहेत. हे फोटो बघून हैवानाचाही थरकाप उडेल अशा क्रूर पद्धतीने नराधमांनी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे एकूण 15 व्हिडिओ व 8 फोटो सीआयडीच्या हाती आले आहेत. हे व्हिडिओ व फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात संतापाची लाट निर्माण होईल. त्यामुळे आता सरकारने यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मीक कराड हा संतोष संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मुख्य आरोपी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर माणुसकी जीवंत आहे की नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर सेल्फी घेताना दिसत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत 66 पुरावे आणि 184 जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटनंतर देशमुखांना क्रूरतेने संपवलेले फोटो समोर आले आहेत. यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी पाईपला करदोड्याने मूठ तयार करून देशमुख यांना मारहाण करण्यात केल्याच्या या व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे. तसेच एका लोखंडी पाईपमध्ये क्लच वायर टाकून त्यानेही बेदम मारहाण केली हे पुरावे सीआयडीने आरोप पत्रात नमूद केले आहे. यामध्ये 66 भक्कम पुरावे जप्त केले असून 184 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले तर पाच गोपनीय साक्षीदारही महत्त्वाचे ठरले आहेत. सुदर्शन घुलेचे एटीएम कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक वाहनात आढळले. या प्रकरणात फोनवरून संभाषण झालेली ऑडिओ क्लिप आणि देशमुख यांना मारहाण करतानाची व्हिडिओ क्लिप जप्त करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो : 1. संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण केल्यानंतर आरोपी त्यांच्या छातीवर पाय देऊन उभा असल्याचे या फोटोमध्ये दिसून येत आहे. 2. संतोष देशमुख यांना मारताना सुदर्शन घुले. 3. संतोष देशमुख यांना मारल्यानंतर राक्षसी खिदळणारा महेश केदार अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया अंजली दमानिया यावर प्रतिक्रिया देताना भावुक झाल्याचे पाहायला मिळाले, धनंजय मुंडे खड्ड्यात जाऊ दे. या माणसाने असे प्रकार करू दिले. गेली 10 वर्षे असे गुन्हे चालू दिले आहेत. कोर्टाच्या ऑर्डर आल्या तरी देखील पोलिस तक्रार घेत नव्हते. हे सगळे फोटो व्हिडिओ बघून मनाचा थरकाप उडाला आहे. मनाला यातना होत आहेत. देशमुख कुटुंबीयांवर काय बेतली असेल याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. इतक्या अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. मारहाण करताना हे हासतान दिसतात, यांच्यात जरा तरी माणुसकी आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, सकाळी मी धनंजयशी बोलले तर ते म्हणाले ते ताई फोटो पाहणार नाही. तो माझा दादा होता. माय ब्रदर माय लाईफ, अशा नावाने त्याने संतोष देशमुखांचा फोन नंबर सेव्ह केला होता. एवढे होऊन पण वाल्मीक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट देण्याची हिंमत होते. वाल्मीक कराडला जमिनीवर झोपवले पाहिजे. स्पेशल जेवण, स्पेशल चहा मिळतो. दोन-दोन तास व्हिडीओ कॉलवर बोलतो. हे काय चालले आहे? माझी पहिल्या दिवसापासून मागणी होती की वाल्मीक कराडला ऑर्थर रोड जेलमध्ये हलवा.

Share

-