धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा:पाठराखण करणाऱ्या नामदेवशास्त्रींनी बोलणे टाळले, प्रकृती खराब असल्याचे दिले कारण

धनंजय मुंडेंच्या पाठीशी भगवान गड भक्कमपणे उभा असून मुंडे गुन्हेगार नाहीत, असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली होती. आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर माध्यमांनी त्यांच्याशी भगवानगडावर जाऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रकृती बीडघडल्याचे कारण देत त्यांनी बोलणे टाळले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याच दबावात आज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. मात्र धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते. मात्र, अखेर महाराष्ट्रातल्या जनतेचा संताप व विरोधकांचा दबाव यामुळे राजीनामा द्यावा लागला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचे कारण वैद्यकीय सांगितले आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिकतेतून राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया दिली होती. धनंजय मुंडे यांनी दिलेले कारण व अजित पवारांनी दिलेली प्रतिक्रिया यात विसंगती दिसून आल्याने देखील संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देणे मात्र टाळले आहे. प्रकृतीचे कारण देत त्यांनी माध्यमांना बोलण्याचे टाळले आहे. काही दिवसांपूर्वी नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंच्या पाठीशी भगवान गड भक्कमपणे उभा असून मुंडे गुन्हेगार नाहीत असे पत्रकार परिषद घेत छातीठोकपणे सांगितले होते. मात्र, आता त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे देखील टाळले असल्याचे दिसून आले आहे.

Share

-