जयंत पाटील दादांचे आणि माझेही ऐकत नाही, हाच प्रॉब्लेम:देवेंद्र फडणवीसांकडून सभागृहातच टोला; सदस्यांमध्ये पिकला ‘हशा’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी वीज वितरण कंपनीच्या आर्थिक स्थितीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना 2003 मधील आघाडी सरकारच्या कार्यकाळाचा दाखला देत टोला लगावला. यावर जयंत पाटील यांनी देखील तेव्हापासून ‘तुमची इच्छा’ असल्याची आठवण करून दिली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील जयंतराव तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता, हाच तुमचा प्रॉब्लेम असल्याचे म्हटले. योग्य गोष्टी, योग्य लोकांसोबत, योग्य वेळी सांगितल्या तरच त्या कार्यान्वित होतात, अशी आठवण देखील फडणवीस यांनी करून दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर बाजूलाच बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘माझ्यासारखे करत नाहीत ते’ असे म्हणताच सभागृहात मोठा हशा पिकला. इतकेच नाही तरी यावर फडणवीस यांनी, ‘जयंत पाटील दादांचे ऐकत नाही आणि माझाही ऐकत नाही, हाच तुमचा प्रॉब्लेम असल्याची पुस्टी जोडली. त्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला होता. रोहित पवार, वरुण सरदेसाई अनभिज्ञ आहेत महाराष्ट्रात होणाऱ्या परकीय गुंतवणुकी वरून देवेंद्र फडणवीस यांनी जयंती पाटील यांना पुन्हा एकदा टोला लगावला. जयंत पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. रोहित पवार वगैरे ठीक आहे, त्यांनी शंका उपस्थित केली तर ती चालू शकते. कारण ते अनभिज्ञ आहेत. मात्र जयंत पाटील नाहीत. रोहित पवार तरुण आहेत, त्यामुळे त्यांनी किंवा वरुण सरदेसाई यांनी शंका उपस्थित केली तर समजू शकते. मात्र तुम्ही तसे करू नका, असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सुरेश भट यांची गझल देखील जयंत पाटील यांना ऐकवली. ते म्हणाले की, साऱ्याच शंकाची अशी मागू नको उत्तरे,
असतात शंकेखोर जे, त्यांचे कधी झाले बरे?

Share

-