फडणवीसांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवावे- उद्धव ठाकरे:म्हणाले- भाजप फेक नरेटीव्ही, त्यांनी आमची बराबरी करून दाखवावी

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी ईशान्य मुंबईत निर्धार शिबीर घेतले. या शिबिरातून त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले की, भाजप ही फेक नरेटीव्ही आहे. उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवावे. त्यासोबतच त्यांनी लाडक्या बहिणींना दिलेले 2100 रुपयांचे आश्वासन पूर्ण करावे आणि त्यानंतरच आमची बराबरी करावी. ठाकरे प्रयागराजला का गेले नाहीत? तसेच, उद्धव ठाकरे यांनी ते प्रयागराजला का गेले नाहीत, या संदर्भात स्पष्टच सांगितले. ते म्हणाले की, आम्ही मोहन भागवत यांचे फॉलोवर आहोत. ते जे करतात ते आम्ही करतो. मोहन भागवत गेले नाही तर मी कसा प्रयागराजला जावू. ते स्वत: जात नाही आणि लोकांना सांगतात. प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर उभारणार – ठाकरे रविवारी चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरू आहे. त्याचा संदर्भ घेत त्यांनी विरोधकांची दांडी उडवणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात आपली सत्ता मी आणणार, त्यांना सोडणार नाही. आम्ही जय श्रीराम बोलू, पण भाजपला जय शिवाजी, जय भवानी बोलण्यास भाग पाडू. प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. क्रिकेटचा संदर्भ देत भाजपवर निशाणा क्रिकेट सामन्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले की, मला स्कोअरची चिंता नाही. विरोधकांची दांडी उडवणार आहे. सामना दुबईत सुरू आहे. टीव्हीवर सामना बघू शकतो. त्यासाठी दुबईत जाण्याची काय गरज? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारे सांगणारे लोक दुबईत गेले होते. ते भारत पाक सामना पाहत होते. फोटो काढत होते. पाकिस्तानी खेळाडू शेजारी बसले होते. भाजप नेत्यांचे घराणेशाही वाले जय शहा गेले होते. ती लोक आम्हाला हिंदुत्व शिकवणार आहे का? उद्धव ठाकरे गेले असते किंवा आदित्य ठाकरे दुबईत गेले असते, तर गदारोळ केला असता. मोहन भागवत मशिदीत जातात. उद्धव ठाकरे अजूनही गेले नाही, आम्ही गेल्यावर त्यांनी काय केले असते? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. भाजप फेक नेरेटीव्ही भाजप देशप्रेमी आहे, हे फेक नेरेटीव्ही आहे. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशासंदर्भात चांगली भूमिका घेत नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, ही भूमिका शिवसेना प्रमुखांची होती. परंतु ते आता आम्हाला देशप्रेम शिकवत आहे. ज्यांच्या स्वातंत्र्यसंग्रमाशी संबंध नाही, त्यांच्याकडे देशाची सूत्र गेली आहेत. संघावाले गच्चीवर लाठ्या काठ्या घेऊन बसतात. ते लोक आम्हाला हिंदुत्व शिकवतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी संघावर केली. कोरोना काळात केलेल्या कामामुळे मुस्लिम सोबत मुस्लिम आमच्यासोबत आले तर यांच्या पोटात काय दुखतंय? लगेच ते व्होट जिहाद म्हणतात. कोरोना काळात केलेल्या कामामुळे मुस्लिम आमच्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, इतकी वर्षे आपण यांना डोक्यावर घेऊन दिल्ली दाखवली, त्यांनी सत्ता मिळाल्यानंतर लगेच खरं रुप दाखवलं. 2014 साली सत्ता आल्यानंतर त्यांनी लगेच युती तोडली. त्यावेळी आम्ही हिंदू नव्हतो का? निवडणूक आयोगाने आपल्यावर अन्याय केला आहे. सर्वोच्च न्यायालयात पक्षाचा निकाल लागत नाही. आता हातात काही नाही, मी काही देऊ शकत नाही. पण तरीही तुम्ही माझ्यासोबत आहात. त्यामुळेच अभिमानाने पुढे जाऊ शकतो असे उद्धव ठाकरे म्हणालेत. बंडखोरी करू नका, ही लढाई महाराष्ट्र धर्माची ठाकरे म्हणाले- लोकसभेनंतर आम्ही गाफील राहिलो. आपण केलेले काम हे विधानसभा निवडणुकीमध्ये जागेच्या साठमारीमध्ये घालवलं, ते लोकांना सांगू शकलो नाही अशी खंत मित्रपक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ही लढाई पक्षाची नाही, राजकीय नाही तर मातृभाषेची, महाराष्ट्र धर्माची आहे. सर्व भेद गाडून मराठी माणसांची एकजूट करा. मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही लागो, तुम्ही तयार राहा. निवडणुकीमध्ये बंडखोरी नको. ही लढाई आईच्या अस्तित्वाची आहे, तिच्याशी गद्दारी करू नका. आज जसा तुम्ही लढण्याचा निर्धार केला, तसा निवडणुकीतही विजयाचा निर्धार करा.