17 वर्षांनंतर ब्रिटनमध्ये अमेरिकी अण्वस्त्राच्या तैनातीची तयारी सुरू:अमेरिकी अध्यक्ष ट्रम्पच्या युक्रेन युद्ध संपण्याच्या प्रयत्नांदरम्यान…

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यात गुंतले आहेत तर दुसरीकडे, एक चकित करणारा गौप्यस्फोट झाला आहे. या वृत्तानुसार, अमेरिका दोन दशकानंतर ब्रिटनमध्ये आपली अण्वस्त्रे तैनात करण्याची योजना आखत आहे. उपग्रह छायाचित्रांवरून स्पष्ट झाले की, सॅफॉक स्थित आरएएफ लॅकेनहीथ तळामध्ये २२ अणु बंकर्सना अपग्रेड केले आहे. या बंकर्समध्ये अंडरग्राउंड चेंबर आहेत. त्यापैकी प्रत्येकात ४ अण्वस्त्रे ठेवता येऊ शकतात. फेडरेशन ऑफ अमेरिकन साइन्टिस्ट्स (एफएएस)च्या अहवालानुसार, अमेरिकेने २०२१ मध्ये लॅकेनहीथच्या आण्विक क्षमता पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय घेतला होता. रशिया-युक्रेन युद्धानंतर या योजनेस अाणखी बळकटी मिळाली आहे. नाटोशी संबंधित दस्तऐवजात स्पष्ट झाले की, ब्रिटनला “ विशेष शस्त्र’ साइटला अपग्रेडेशनच्या यादीत जोडले आहे. पेंटागॉन खरेदी करारांनीही लॅकेनहीथमध्ये नव्या सुविधेच्या योजनेला दुजोरा दिला. वृत्तानुसार, अमेरिका २० वर्षांनंतर ब्रिटनमध्ये आपली आण्विक मोहीम स्थापन करत आहे. चिंता : जगातील ९ देशांकडे १२ हजार अणुबॉम्ब, सर्वाधिक ५५८० रशियाकडे फेडरेशन ऑफ अमेरिकन साइन्टिस्टनुसार, जगातील ९ देशांकडे १२ हजारांहून जास्त अणुबॉम्ब आहेत. सर्वात जास्त ५५८० रशिया, ५०४४ अमेरिका, ५०० चीन, २९० फ्रान्स, २२५ ब्रिटन, १७२ भारत, १७० पाकिस्तान, ९० इस्रायल आणि ५० उत्तर कोरियाकडे आहेत. यात रशियाने १७१० आणि अमेरिकेने १६७० आणि फ्रान्सने २९० अण्वस्त्रे तैनात केली आहेत. दुसरीकडे, भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरियासह अन्य सर्व देशांची शस्त्रे स्टोअरमध्ये आहेत. रशिया म्हणाला, तैनातीची योजना तणाव वाढवणारी, वेळ आल्यावर उत्तर देऊ १९५४ मध्ये आरएएफ लॅकेनहीथसह ब्रिटनच्या ठिकाणांवर अमेरिकी बॉम्ब तैनात केले होते. १९९० मध्ये ३३ बंकर होते, जे १३२ अमेरिकी अण्वस्त्रांना संग्रहीत करण्यात सक्षम होते. शीतयुद्धाच्या समाप्तीसोबत तणाव कमी झाल्यावर २००८ मध्ये जेव्हा जॉर्ज डब्ल्यू बुश अध्यक्ष हाेते तेव्हा, ब्रिटनमधून अमेरिकी अण्वस्त्रे हटवली होती. या गौप्यस्फोटानंतर रशियन राष्ट्राध्यक्ष भवन क्रेमलिनने या योजनेला तणाव वाढवणारी ठरवले आणि वेळ आल्यावर प्रत्युत्तर दिले जाईल,असे म्हटले आहे.

Share

-